bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 02:37 PM2021-06-01T14:37:40+5:302021-06-01T14:39:25+5:30

Bird flu: जागतिक स्तरावर H10N3 पासून मानवी संसर्गाची इतर कोणतीही घटना नोंदली गेलेली नाही, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bird flu: china reports first human case of h10n3 bird flu | bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना 

bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना 

googlenewsNext
ठळक मुद्देझेंजियांग शहरातील 41 वर्षीय व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा स्ट्रेन आढळला, सध्या या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

चीनमध्ये एक व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की, चीनने देशातील पूर्व जिआंगसू प्रांतात बर्ड फ्लूच्या  H10N3 स्ट्रेनसह मानवी संसर्गाची पहिली घटना नोंदविली आहे. झेंजियांग शहरातील 41 वर्षीय व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा स्ट्रेन आढळला, सध्या या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर आहे. (china reports first human case of h10n3 bird flu)

28 मे रोजी रुग्णामध्ये H10N3 एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचे निदान झाले. या व्यक्तीला बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनचा संसर्ग कसा झाला, हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी जागतिक स्तरावर H10N3 पासून मानवी संसर्गाची इतर कोणतीही घटना नोंदली गेलेली नाही, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले.


H10N3, बर्ड फ्लू विषाणूचा एक कमी रोगजनक किंवा तुलनेने कमी गंभीर स्ट्रेन आहे आणि व्यापक प्रसार होण्याचा धोका खूप कमी आहे. चीनमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझाचे विविध स्ट्रेन आहेत आणि काही तुरळक लोकांना संक्रमित करतात, सामान्यत: जे पोल्ट्रीचा व्यवसाय करतात.

H5N8 इन्फ्लूएंझा ए विषाणूचा (याला बर्ड फ्लू विषाणू देखील म्हणतात) एक उपप्रकार आहे. H5N8 हा मानवासाठी कमी धोका दर्शवितो, तर  वन्य पक्षी आणि कोंबड्यांसाठी अत्यंत प्राणघातक आहे. एप्रिलमध्ये ईशान्य चीनमधील शेनयांग शहरातील जंगली पक्ष्यांमध्ये अति रोगजनक H5N6 एव्हियन फ्लू आढळला होता.


1997 मध्ये H5N1 चे पहिले प्रकरण समोर आले होते 
बर्ड फ्लू पसरविण्यासाठी बरेच विषाणू जबाबदार आहेत. पण यामध्ये  H5N1 धोकादायक मानला जातो. कारण हा विषाणू मानवांमध्ये बर्ड फ्लूचा वाहक म्हणून काम करतो आणि त्यांचा बळी घेतो. मानवांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची पहिली घटना 1997 मध्ये आली होती. ज्यावेळी हाँगकाँगमध्ये  कोंबडीपासून एका व्यक्तीमध्ये या विषाणूचा संसर्ग झाला होता.

2003 पासून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव चीन, युरोप, आफ्रिका या देशांसह आशियाच्या बर्‍याच देशांमध्ये दिसून आला. चीनमध्ये 2013 साली बर्ड फ्लूचा संसर्ग एका व्यक्तीमध्ये आढळला होता. दरम्यान, WHO चा दावा आहे की, बर्ड फ्लू सहसा मानवांमध्ये संक्रमित किंवा परिणाम करीत नाही. मात्र, आता बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनचे नवीन प्रकरण समोर आले आहे.

Web Title: Bird flu: china reports first human case of h10n3 bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.