विमानाला पक्ष्याची धडक

By admin | Published: July 15, 2014 01:54 AM2014-07-15T01:54:26+5:302014-07-15T01:54:26+5:30

एअर इंडियाचे ३१३ प्रवासी असणारे ७७७ विमान पक्ष्याची धडक बसल्याने उड्डाणानंतर काही वेळात नेवार्क विमानतळावर परत आले असून, पक्ष्यामुळे विमानाचे डावे इंजिन नादुरुस्त झाल्याचे आढळले आहे.

Bird flyer | विमानाला पक्ष्याची धडक

विमानाला पक्ष्याची धडक

Next

नेवार्क : एअर इंडियाचे ३१३ प्रवासी असणारे ७७७ विमान पक्ष्याची धडक बसल्याने उड्डाणानंतर काही वेळात नेवार्क विमानतळावर परत आले असून, पक्ष्यामुळे विमानाचे डावे इंजिन नादुरुस्त झाल्याचे आढळले आहे.
रविवारी सायंकाळी ४.३० वाजता नेवार्कच्या लिबर्टी विमानतळावरून फ्लाईट क्र . एआय १४४ ने उड्डाण केले होते. सायंकाळी ५ वाजता हे विमान पुन्हा याच विमानतळावर परतून आले. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाचे डावे इंजिन नादुरुस्त झाले होते. प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले व पर्यायी व्यवस्था होईपर्यंत हॉटेलमध्ये थांबवण्यात आले. विमानाच्या दुरुस्तीसाठी दिल्लीतून नेवार्कपर्यंत सामान वाहून आणण्यात आले. या विमानात १८ प्रवासी बिझनेस क्लासमध्ये व २७४ इकानॉमी क्लासमध्ये होते. बाकीचे कर्मचारी होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Bird flyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.