जन्मदात्यांनी टाकून दिले, पण नंतर सुदैवी ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 01:57 AM2017-06-13T01:57:35+5:302017-06-13T01:57:35+5:30
घरात बाळ येणार म्हटले की त्याच्या आईबाबांसह सगळ््या कुटुंबाला आनंद होतो. परंतु या तीन बाळांना दुर्देवी म्हणावे लागेल, कारण त्यांना आईबाबांचे प्रेमच मिळाले नाही.
- घरात बाळ येणार म्हटले की त्याच्या आईबाबांसह सगळ््या कुटुंबाला आनंद होतो. परंतु या तीन बाळांना दुर्देवी म्हणावे लागेल, कारण त्यांना आईबाबांचे प्रेमच मिळाले नाही. नंतर त्यांचे दुर्देव संपले. मॅकी, मॅकेंझी आणि मेडिलियन हे तिळे जन्माला आले व यांचा जन्म दुर्मिळ प्रकारातील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याचे कारण असे की यातील दोन मुली या एकमेकांशी जोडलेल्या आहेत तर तिसरीचे आरोग्य चांगले आहे. यांचा जन्म देणाऱ्या आई वडिलांची या तिघांचे पालनपोषण करण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांना निराधार सोडून दिले. या तिघांचाही ताबा अमेरिकेतील आयोवात राहणाऱ्या गॅरिसन कुटुंबाकडे आहे.
जेफ आणि डार्ला गॅरिसन यांना आधीच तीन मुले आहेत तरीही त्यांनी आनंदाने या तिघांना घेतले. गॅरिसन कुटुंबाने या तिघांना स्वीकारलेच, असे नाही तर एकमेकांशी जोडलेल्या मुलींना वेगळे करण्याची शस्त्रक्रियाही करून घेतली. सप्टेंबर २०१३ मध्ये ही बाळे नऊ महिन्यांची असताना त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. ही शस्त्रक्रिया २४ तास चालली व मुलींना नवे आयुष्य मिळाले. शस्त्रक्रियेनंतर या मुली वेगळ््या तर झाल्या पण दोघींनाही एकेक पाय गमवावा लागला. डॉक्टरांनी या दोघींना एकेक कृत्रिम पाय बसवला. तिन्ही मुली गॅरिसन कुुटुंबाने कायदेशीरित्या स्वीकारल्या आहेत. आता ते आपल्या सहाही अपत्यांसह आयोवातील फार्म हाऊसवर राहतात.