अमेरिकेच्या महामार्गावर झाला विचित्र अपघात
By admin | Published: July 15, 2017 01:35 PM2017-07-15T13:35:51+5:302017-07-15T13:35:51+5:30
अमेरिकेच्या महामार्गावर अत्यंत विचित्र अपघात घडला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिग्टन, दि. 15- रस्त्यावर टँकर पलटून तेल सांडणं, गाडी डिव्हायडरवर आदळून अपघात होणं किंवा काही गाड्यांची एकत्र तोडफोड होणं असे अपघात आपण पाहतं असतो. बऱ्याचदा रस्त्यावर विचित्र अपघात झाल्याचंही पाहायला मिळतात. पण अमेरिकेच्या महामार्गावर अत्यंत विचित्र अपघात घडला आहे. साडेतीन हजार किलोपेक्षा जास्त ईल माशांना घेऊन एक ट्रक निघाला होता. पण ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातादरम्यान ट्रकमध्ये असणारे ईल मासे रस्त्यावर पडले होते. हे मासे रस्त्यावर पडल्यावर त्यांच्या शरीरातून पांढऱ्या रंगाचा पदार्थ बाहेर पडायला सुरूवात झाली होती. अपघातात मासे रस्त्यावर पडले आणि त्यामुळे पांढरा चिकट पदार्थ रस्त्यावर पसरला. खरंतर जेव्हा हे मासे एखाद्या परिस्थितीत सापडतात तेव्हा त्यांच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर पडतो. अमेरिकेच्या हायवेवरील या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.
महामार्गावर अपघात झाल्याने तेथून जाणाऱ्या गाड्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पांढरा चिकट पदार्थ रस्त्यावर पसरल्याने गांड्याना पुढे जाणं कठीण झालं होतं. त्यामुळे गाड्यांचं नुकसानही झालं आहे. . हे मासे रस्त्यावरून साफ करायला बरीच मेहनतही करावी लागली. अमेरिकेच्या महामार्ग क्रमांक 101 वर ही घटना घडली आहे. रस्त्याची साफसफाई करताना बऱेच मासे मारले गेले आहेत. ईल माशांना हॅगफिश असंही बोललं जातं. ईल मासे त्यांच्या ग्रंथीतून पांढरा चिकट पदार्थ शरीराबाहेर सोडत असतात. त्यामुळे समुद्रात असताना इतर मोठ्या माशांपासून त्यांना त्यांच रक्षण करता येतं. प्रशांत महासागच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात ईल मासे आढळून येतात.
आणखी वाचा
भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव
दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद
डेंग्यू, मलेरियाला "या" माशांमुळे बसणार आळा
काही दिवसांपूर्वी व्हिएन्नाच्या रस्त्यावर कोंबड्यांना घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटला होता. ट्रक उलटल्याने ट्रकच्या आतमधील जिवंत कोंबड्या असणारे लहान पिंजरे रस्त्यावर पडले. ट्रक रस्त्यावर उलटल्यानंतर अनेक पिंजऱ्यातील कोंबड्यांचा मृत्यू झाला. पण काही कोंबड्या यावेळी पिंजऱ्यातून बाहेर आल्या होत्या. त्यानंतर कोंबड्यांना महामार्गावर मोठा गोंधळ निर्माण केला. रस्त्यावर सगळीकडे कोंबड्या फिरत असल्याने तेथे वाहतुकीची चांगलीच तारांबळ उडाली होती. ट्रकमध्ये जवळपास सात हजारांहून अधिक कोंबड्या होत्या.