भाजपा जगातील सर्वात महत्त्वाचा पक्ष; अमेरिकन वृत्तपत्रानं केलं CM योगींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 08:34 AM2023-03-22T08:34:26+5:302023-03-22T08:35:51+5:30

ज्यांच्या मदतीविना चीनच्या वाढत्या शक्ती रोखण्यासाठी अमेरिकेचे सुरू असलेले प्रयत्न अयशस्वी ठरतील असं त्यांनी सांगितले आहे.

BJP is the most important party in the world; American newspaper praised CM Yogi and RSS | भाजपा जगातील सर्वात महत्त्वाचा पक्ष; अमेरिकन वृत्तपत्रानं केलं CM योगींचं कौतुक

भाजपा जगातील सर्वात महत्त्वाचा पक्ष; अमेरिकन वृत्तपत्रानं केलं CM योगींचं कौतुक

googlenewsNext

नवी दिल्ली - अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात महत्त्वाची पार्टी असल्याचं म्हटलं आहे. भाजपा सलग तिसऱ्यांदा २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दिशेने जात आहे. येणाऱ्या काळात भाजपा देशात स्वत:चं वर्चस्व निर्माण करेल. ज्यांच्या मदतीविना अमेरिका चीनच्या वाढत्या ताकदीला रोखू शकत नाही असं अमेरिकेचे प्रमुख नेते वाल्टर रसेल मीड यांनी म्हटलं आहे.

मीड यांनी पुढे लिहिलंय की, अमेरिकेचे राष्ट्रीय हित लक्षात घेता भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आले, त्यानंतर २०१९ मध्ये आणि आता २०२४ मध्येही पुन्हा सत्तेच्या दिशेने भाजपा वाटचाल करत आहे. भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना भाजपा देशाच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी आहे. जपानसोबत इंडो पॅसिफिकसाठी भारताची भूमिका अमेरिकेच्या रणनीतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नजीकच्या काळात भाजपा देशाच्या निर्णायक भूमिकेत असेल. ज्यांच्या मदतीविना चीनच्या वाढत्या शक्ती रोखण्यासाठी अमेरिकेचे सुरू असलेले प्रयत्न अयशस्वी ठरतील असं त्यांनी सांगितले आहे.

त्याचसोबत भाजपाचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास अनेक परदेशी लोकांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना हे समजू शकत नाही. मुस्लिम ब्रदरहुड प्रमाणेच, आधुनिकतेची प्रमुख वैशिष्ट्ये स्वीकारताना भाजपाने पाश्चात्य उदारमतवादाच्या अनेक कल्पना आणि प्राधान्यक्रम नाकारले आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाप्रमाणेच, एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे नेतृत्व करून जागतिक महासत्ता बनण्याची भाजपाची अपेक्षा आहे.

दरम्यान, अमेरिकेचे विश्लेषक, विशेषत: डाव्या-उदारमतवादी विचारसरणीचे लोक अनेकदा मोदींवर प्रश्न निर्माण करतात. त्यांची चिंता देखील पूर्णपणे चुकीची नाही. भारताच्या सत्ताधारी पक्षावर टीका करणार्‍या पत्रकारांना छळवणुकीला सामोरे जावे लागू शकते. हिंदुत्व विचारसरणीच्या विरोधात असलेल्या भारतीय अल्पसंख्याकांना जमावातील हिंसाचार आणि धर्मांतर विरोधी कायद्यांचा सामना करावा लागतो. अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताकदीला घाबरतात. जी एक हिंदू राष्ट्रवादी संघटना आहे असं लीड यांनी आपल्या लेखात लिहिले आहे.

मुख्यमंत्री योगी- मोहन भागवत यांचा उल्लेख
या लेखात लीड यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या भेटीचा उल्लेख केला आहे 'भाजपा, आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यांच्या काही टीकाकारांच्या सखोल बैठकीनंतर, मी पूर्ण विश्वासाने म्हणू शकतो की अमेरिकन आणि पाश्चिमात्य लोकांना या शक्तीशाली आंदोलनात अधिक सखोलपणे सहभागी होण्याची गरज आहे. उपेक्षित बुद्धिजीवी आणि धार्मिक उत्साही लोकांचा समावेश असलेली RSS ही कदाचित जगातील सर्वात शक्तिशाली नागरी-समाज संघटना बनली आहे.

दरम्यान, मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असलेले हिंदू संन्यासी योगी आदित्यनाथ यांना भेटलो, ज्यांना चळवळीतील सर्वात कट्टरपंथी आवाजांपैकी एक मानले जाते आणि त्यांच्याकडे ७२ वर्षीय पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते, त्यांचे माझ्याशी बोलणे उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणि विकास आणण्याबाबत होते. तसेच, आरएसएसचे आध्यात्मिक नेते मोहन भागवत यांनी भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्याची गरज आहे आणि धार्मिक अल्पसंख्याकांना देशात भेदभाव किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन होत नसल्याचं भागवत यांनी सांगितले असंही लेखात उल्लेख आहे. 

Web Title: BJP is the most important party in the world; American newspaper praised CM Yogi and RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.