पाकव्याप्त काश्मीरमध्ये काळा दिवस, आंदोलकांवर लाठीचार्ज

By admin | Published: October 27, 2016 09:42 AM2016-10-27T09:42:32+5:302016-10-27T09:53:13+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काळा दिवस पाळणा-या आंदोलकांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे.

Black days in Pak-occupied Kashmir, lathi charge on protesters | पाकव्याप्त काश्मीरमध्ये काळा दिवस, आंदोलकांवर लाठीचार्ज

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काळा दिवस, आंदोलकांवर लाठीचार्ज

Next
ऑनलाइन लोकमत
मुझफ्फराबाद, दि. 27 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये काळा दिवस पाळणा-या आंदोलकांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. आंदोलकांना काळा दिवस पाळत मूक मोर्चा काढला होता, मात्र तरीही पोलिसांनी लाठीचार्ज केला. युनायटेड काश्मीर पिपल्स नॅशनल पार्टीकडून काळा दिवस पाळण्यात येत असून पाकिस्तानने भारतासोबत शांततापूर्ण चर्चा करावी तसंच पाकव्याप्त काश्मीरमधून आपले सैन्य मागे घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. 22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानने करार मोडत काश्मीरमध्ये सैन्य घुसवलं होतं त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो.
 
आंदोलकांनी यावेळी पाकिस्तानविरोधी नारे दिले. पाकव्याप्त काश्मीरमधून आपले सैन्य मागे घ्यावे, आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे, आम्ही अजून सहन करणार नाही असे पोस्टर्स झळकवण्यात आले. पाकिस्तान स्वत:ला सांभाळू शकत नाही. नवाझ शरीफ जगाच्या कोणत्याही कोप-यात गेले तरी राहिल शरीफ यांना घेऊन जातात अशी टीका पोस्टरच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे.
 

Web Title: Black days in Pak-occupied Kashmir, lathi charge on protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.