इराकी रिफायनरीवर काळे ध्वज
By admin | Published: June 20, 2014 03:06 AM2014-06-20T03:06:45+5:302014-06-20T03:06:45+5:30
इराकच्या सर्वात मोठय़ा तेल प्रकल्पावर (रिफायनरी) सुन्नी दहशतवाद्यांनी आपले काळे ध्वज उभारले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले
Next
>बगदाद : इराकच्या सर्वात मोठय़ा तेल प्रकल्पावर (रिफायनरी) सुन्नी दहशतवाद्यांनी आपले काळे ध्वज उभारले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले असून, हा प्रकल्प दहशतवाद्यांच्या ताब्यात गेल्याचे हे संकेत आहेत. इराकच्या उत्तरेकडील मोठा भूभाग दहशतवाद्यांच्या ताब्यात गेला आहे.
इराकी साक्षीदार बैजी रिफायनरीवरून कारने पुढे आल्यानंतर त्याने ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांनी बैजी रिफायनरीच्या आवारात चेकनाके उभारले आहेत, असेही त्याने सांगितले. तेलाच्या एका टँकरला बुधवारी लावलेली आग अजूनही उसळत असल्याचेही त्याने सांगितले. या साक्षीदाराने आपले नाव न छापण्याची अट घातली आहे, अन्यथा नाव प्रकाशित झाल्यास दहशतवादी आपल्यावर कारवाई करतील, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.
इराकच्या सुरक्षा अधिका:यांनी तेल प्रकल्पावर आपलाच ताबा असल्याचा दावा केला आहे. तेल प्रकल्पाच्या अंतर्भागात अजूनही सरकारी सैनिक तैनात आहेत, तसेच या प्रकल्पाच्या संरक्षणासाठी हेलिकॉप्टर तोफा घिरटय़ा घालत असून, दहशतवाद्यांना पुढे येण्यापासून रोखत आहेत. दहशतवाद्यांनी तेल प्रकल्पाच्या बाहेरचा भाग ताब्यात घेतला आहे. इराकी सैनिकांना बाहेर काढण्यासाठी ते आजूबाजूला आग लावत आहेत, असे या अधिका:याने सांगितले. (वृत्तसंस्था)
-बैजी तेलप्रकल्पातून देशातील 25 टक्के भागाला ऊर्जा पुरवठा होतो. देशांतर्गत वापरासाठी रॉकेल, स्वयंपाकाचे तेल व ऊर्जा प्रकल्पासाठी इंधनही येथूनच पुरविले जाते. हा प्रकल्प दहशतवाद्यांच्या हातात गेल्यास ऊर्जा तुटवडा निर्माण होऊन देशात गोंधळ माजेल, असे या अधिका:याने सांगितले.