विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:06 PM2020-07-16T16:06:56+5:302020-07-16T16:46:38+5:30

विशेष म्हणजे तिनं एक, दोन नव्हे तर, तब्बल 80 हजार पॉर्न फोटो डाऊनलोड केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व अश्लील पॉर्न फोटो हे लहान मुलांचे होते.

Blackpool woman accessed child abuse images in hospital bed | विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी

विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी

Next

लंडनः  लॉकडाऊनमध्ये जगभरात मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. प्रत्येक देशात मुलांच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे केले गेले आहेत, परंतु तरीही गुन्हेगार मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. गुन्हेगारी मानसिकता असलेले लोक कोणत्याही परिस्थितीत केवळ गुन्ह्याबद्दलच विचार करत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या एका तृतीयपंथी महिलेनं सार्वजनिक वायफायवरून लहान मुलांचे अश्लील फोटो डाऊनलोड केले आहेत. विशेष म्हणजे तिनं एक, दोन नव्हे तर, तब्बल 80 हजार पॉर्न फोटो डाऊनलोड केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व अश्लील पॉर्न फोटो हे लहान मुलांचे होते.

लंडनच्या पोलिसांनी तिच्या घरावर छापा मारल्यानंतर दोन लॅपटॉप, एक फोन आणि बऱ्याच सिडी सापडल्या. जेव्हा तिचा लॅपटॉप तपासला गेला तेव्हा त्यात हजारो चाइल्ड पॉर्न फोटो सापडले आहेत. यानंतर 54 वर्षीय तृतीयपंथीय वृद्ध महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या लॅपटॉप अन् मोबाइलमध्ये फोटो सापडल्याचं सांगितलं, त्यानंतर लंडनच्या प्रेस्टन क्राउन कोर्टानं तिला शिक्षा सुनावली. आता या महिलेला पुरुषांच्या तुरुंगात ठेवायचे की महिलांच्या तुरूंगात टाकायचं याबाबत पोलीसही संभ्रमात पडले आहेत. 

या तृतीयपंथी महिलेच्या लॅपटॉपवरून पोलिसांना 80 हजार मुलांचे अश्लील फोटो मिळाले आहेत. 15 वर्षांच्या कालावधीत तिनं ही छायाचित्रे जमा केली आहेत. यासाठी तिला नऊ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 54 वर्षीय गुन्हेगार तृतीयपंथीची ओळख ज्युली मार्शल अशी झाली आहे. रुग्णालयाच्या पलंगावर झोपून तिनं हे फोटो डाऊनलोड केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर तिला ऑगस्ट 2017 पासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.ज्युलीला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिचा इंटरनेट पॅक लवकरच संपत होता. त्याऐवजी सार्वजनिक वायफायच्या बरेच वेगानं चालत होते. त्यानंतर रुग्णालयाचंही वायफाय मोठ्या प्रमाणात वापरल्यानं प्रशासनाच्या लक्षात आलं. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाने सर्व इंटरनेट कुठे वापरले गेले आहे, याचा तपास केला, तेव्हा ज्युलीच्या सिस्टमवरून डाऊनलोड झाल्याचे उघड झाले. 2004 ते 2018 या कालावधीत तिनं हे सर्व अश्लील फोटो डाऊनलोड केले आहेत. 

जेव्हा कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली, तेव्हा या अश्लील चित्रांना तीन प्रकारांमध्ये विभागले गेले. त्यानुसार कोर्टाने ज्युलीला 9 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टानं तिला पुन्हा अशी चूक करू नको, असं बजावले आहे. यूकेमध्ये 2016पर्यंत तृतीयपंथी गुन्हेगारांना महिलांच्या कक्षात ठेवण्यात येत होते. परंतु काही प्रकरणांमध्ये त्यांनी महिला कैद्यांवर हल्ला केला, त्यानंतर त्यांना पुरुषांच्या जेलमध्ये ठेवले गेले. परंतु इतर गुन्हेगार पुरुषांच्या सेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करतात. या कारणास्तव ज्युलीला ठेवायचं कुठे हा पोलिसांना प्रश्न पडला आहे. 

हेही वाचा

आता ग्राहक होणार पॉवरफुल्ल; मोदी सरकार 20 जुलैला नवा कायदा लागू करणार

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

मोठी बातमी! 'या' बँकांनी मिनिमम बॅलन्स अन् व्यवहाराचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?

Web Title: Blackpool woman accessed child abuse images in hospital bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.