प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला ६ वर्षांची शिक्षा
By Admin | Published: July 6, 2016 02:10 PM2016-07-06T14:10:53+5:302016-07-06T14:25:04+5:30
ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
स्टेलेनबोस्च ( दक्षिण आफ्रिका), दि. ६ - 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पिस्टोरियसला तत्काळ तुरूंगात नेण्यात आले.
२०१३ साली व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी मॉडेल रिव्हा स्टिनकॅम्प हिची हत्या झाली होती व ऑस्करवर तिच्या खुनाचा आरोप लावण्यात आला होता.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने ऑस्करला दोषी ठरवत ५ वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा ठोठावली, मात्र काही काळानंतर त्याची जामिनावरही सुटकाही झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येच्या गुन्हयाखाली दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने ऑस्करला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. मात्र या शिक्षेला दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर ऑस्करला त्याच्या काकांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले. अखेर आज झालेल्या सुनावणी दरम्यान त्याला दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
न वर्षांपूर्वी २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी ऑस्करने त्याच्या घरी केलेल्या गोळीबारात प्रेयसी रिव्हाचा मृत्यू झाला होता. आपण घरात चोर घुसल्याचे समजून गोळीबार केला. त्यात अनावधानाने रिव्हाचा मृत्यू झाला असा बचाव त्याने केला होता. पॅराऑल्मपिकमध्ये सहा सुवर्णपदके मिळवणा-या ऑस्कर २०१२ लंडन मुख्य ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता. शारीरीकदृष्टया अपंग असूनही मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला धावपटू ठरला होता.