मुक्त व्यापारासाठी मोदींचे मर्केल यांना साकडे

By admin | Published: April 15, 2015 01:43 AM2015-04-15T01:43:03+5:302015-04-15T01:43:03+5:30

युरोपियन युनियनशी मुक्त व्यापार कराराचे दोन वर्षांपासून अडलेले गाडे पुन्हा सुरू करण्यासाठी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी मदत करावी,

Blame Modi's Merkel for free trade | मुक्त व्यापारासाठी मोदींचे मर्केल यांना साकडे

मुक्त व्यापारासाठी मोदींचे मर्केल यांना साकडे

Next

बर्लिन : युरोपियन युनियनशी मुक्त व्यापार कराराचे दोन वर्षांपासून अडलेले गाडे पुन्हा सुरू करण्यासाठी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी मदत करावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हा करार संतुलित असावा व दोन्ही बाजूंसाठी लाभदायक असावा, असे मोदी यांनी म्हटले आहे.
भारत व युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर सुरू व्हाव्यात यासाठी मर्केल यांनी मदत करावी, अशी विनंती मी केली आहे, असे मोदी यांनी सांगितले. मोदी व मर्केल यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारत जागतिक उत्पादनाचे केंद्र बनणे, तसेच भारतातील पायाभूत सुविधांचा विस्तार होणे या बाबी मुक्त व्यापार करारासाठी लाभदायक आहेत. दरम्यान मोदी मंगळवारी कॅनडाकडे रवाना झाले आहेत.
भारत व युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. २००७ साली विस्तृत व्यापारासाठी वाटाघाटी सुरू करण्यात आल्या होत्या. व्यापार व गुंतवणूक करारासाठी भारत व २८ युरोपियन देश यांच्यातील या वाटाघाटीत अनेक अडचणी आल्या. महत्त्वाच्या मुद्यावर मतभेद असल्याने ही बोलणी पुढे सरकू शकली नाही. अजूनही जकात व व्यावसायिकांचे स्थलांतर हे दोन मुद्दे सुटलेले नाहीत; पण युरोपियन युनियनने पुन्हा वाटाघाटी
सुरू करण्याची इच्छा दर्शविली आहे. वाहन उद्योगावर करकपात, तसेच डेअरी उत्पादने, मद्य, स्पिरीट यांच्यावरील करारातही त्यांना कपात हवी आहे, तर भारताला युरोपियन युनियनकडून माहिती सुरक्षितता हवी असून, तसा दर्जा युरोपियन युनियनने द्यावा अशी मागणी आहे. युरोपियन युनियनमध्ये भारताला असा दर्जा
नाही. भारताला या २८ देशांत
व्हिसा नियमातही शिथिलता हवी आहे. (वृत्तसंस्था)

नेताजींच्या नातवाशी भेट
च्स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सूर्यकुमार बोस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बर्लिन येथे भेट घेतली. नेताजी यांच्या संदर्भातील गोपनीय कागदपत्रे उघड करावीत, अशी विनंती सूर्यकुमार यांनी मोदी यांना केली.
च्नेताजींसंदर्भातील सर्व गोपनीय कागदपत्रे उघड करू , असे आश्वासन मोदी यांनी दिले, असे सूर्यकुमार यांनी सांगितले. सूर्यकुमार हे इंडो-जर्मन संघटनेचे अध्यक्ष आहेत.

Web Title: Blame Modi's Merkel for free trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.