अफगाणिस्तानात सेनेच्या वाहनाजवळ बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 08:54 PM2019-10-07T20:54:47+5:302019-10-07T20:55:05+5:30
अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं आहे.
काबूलः अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. जलालाबाद शहरात एक मोठा बॉम्बस्फोट झाला असून, यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या हल्ल्यात 27 जण जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्ब एका रिक्षातून आणण्यात आला होता आणि ती रिक्षा सेनेच्या वाहनाजवळ नेऊन स्फोट घडवून आणला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अद्यापही या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही.
10 people were killed - including a child - and 27 were wounded when explosive materials placed in a rickshaw went off near an Afghan army vehicle in Jalalabad city in Nangarhar province, local officials confirmed: TOLOnews #Afghanistanpic.twitter.com/EZ0dazAvX4
— ANI (@ANI) October 7, 2019