प्राण्याला मारलेली गोळी परत येऊन लागली
By admin | Published: August 2, 2015 01:08 AM2015-08-02T01:08:00+5:302015-08-02T01:08:00+5:30
शिकारी आपल्याच गोळीने जखमी झाल्याची अनोखी घटना अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात घडली. त्याचे झाले असे की, शिकाऱ्याने गोळी मारल्यानंतर ती प्राण्याच्या कातडीवर धडकून परत
वॉशिंग्टन : शिकारी आपल्याच गोळीने जखमी झाल्याची अनोखी घटना अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात घडली.
त्याचे झाले असे की, शिकाऱ्याने गोळी मारल्यानंतर ती प्राण्याच्या कातडीवर धडकून परत शिकाऱ्यालाच लागली. हे वाचून तुम्ही हैराण झाला असाल की, असे कसे घडले. वस्तुत: या व्यक्तीने मध्य अमेरिकेतील टणक कवचधारी आर्माडिलो या प्राण्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
आर्माडिलोच्या शरीरावरील टणक कवच हे बुलेटप्रूफ कवचासारखे असते. त्यामुळे आर्माडिलोचे शिकारी प्राण्यांपासून संरक्षण होते.
आपल्या शिकाऱ्याचीच शिकार करणारा हा आर्माडिलो जिवंत आहे की नाही हे समजू शकले नाही; मात्र पोलिसांना या व्यक्तीच्या घराजवळ कुठेही हा प्राणी आढळून आला नाही, त्यामुळे तो जिवंत असावा, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या बागेत एक छोटा प्राणी पाहिल्यानंतर त्याने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याची पत्नी घरातच होती. तो घरातून बाहेर आला व त्याने त्याच्या. ३८च्या रिव्हॉल्व्हरमधून आर्माडिलोवर तीन गोळ्या झाडल्या. तेव्हा एक गोळी आर्माडिलोच्या कवचावर धडकून मागे फिरत झाडणाऱ्याच्या जबड्याला लागली. या व्यक्तीला त्वरित टॅक्सकन शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्या जबड्यावर उपचार करण्यात येत आहेत.