Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेची राजधानी कोलंबो पुन्हा हादरले, पुगोडा शहरात जोरदार स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:26 AM2019-04-25T10:26:19+5:302019-04-25T10:47:25+5:30
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
कोलंबो - श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. रविवारी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे आतापर्यंत सुमारे 359 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचे श्रीलंकन सरकारने संसदेत सांगितले होते. श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेट या दहशतावी संघटनेने अल अमाक या यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले होते.
Reuters: Blast heard in Pugoda town, 40 km east of Sri Lankan capital Colombo
— ANI (@ANI) April 25, 2019
श्रीलंका बॉम्बस्फोटातील आत्मघाती हल्लेखोराचा VIDEO व्हायरल
श्रीलंकेतील एका आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओसमोर आला आहे. यामध्ये एक तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्च परिसरात पोहोचला होता. त्याच्या हातात स्फोट घडवण्यासाठी रिमोट होता. चर्चमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्याने स्फोट घडवून आणला. श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटामुळे भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले होते.
#WATCH Colombo: CCTV footage of suspected suicide bomber (carrying a backpack) walking into St Sebastian church on Easter Sunday. #SriLankaBombings (Video courtesy- Siyatha TV) pic.twitter.com/YAe089D72h
— ANI (@ANI) April 23, 2019