अफगाणिस्तानमध्ये मदरशात नमाज अदा करताना भीषण स्फोट, 10 मुलांसह 15 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:10 PM2022-11-30T18:10:23+5:302022-11-30T18:15:20+5:30
अफगाणिस्तानमध्ये बुधवारी मोठा स्फोट झाला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये बुधवारी मोठा स्फोट झाला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा बॉम्बस्फोट अफगाणिस्तानच्या समांगन प्रांतातील ऐबक शहरात झाला. मदरशामध्ये झालेल्या स्फोटात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
केवढा हा दिलखुलासपणा! लिव्ह इनमध्ये होते; मध्येच त्याच्या कंपनीतील तरुणीची एन्ट्री झाली अन्...
अफगाणिस्तान गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी या संदर्भात माहिती दिली. उत्तर सामंगन प्रांताची राजधानी ऐबक येथे झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवक्ते अब्दुल नफी टाकोर यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फुटेजमध्ये मृतदेह हॉलमध्ये पडलेले दिसतात. तालिबान अधिकार्यांनी स्फोटाच्या ठिकाणी लोकांना व्हिडिओ बनवण्यास मनाई केली आहे आणि कोणत्याही नागरिकांना भेट देण्याची परवानगी नाही. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
At least 15 dead and 27 were wounded in a blast that took place in Jahdia seminary in Aybak city of Samangan during the afternoon prayer, reports Afghanistan's TOLO news citing a provincial hospital doctor
— ANI (@ANI) November 30, 2022
इसिसने अनेकदा मशिदींमध्ये आणि नमाजाच्या वेळी स्फोट घडवले आहेत. अफगाणिस्तानातील शिया समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य केले आहे. ऑगस्टमध्ये काबूलमधील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला होता. शैक्षणिक केंद्रेही बॉम्बस्फोटांचे लक्ष्य बनली आहेत. ऑक्टोबरमध्ये, हजारा, काबूल येथील शाळेवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 52 लोक ठार झाले.