अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरात स्फोट, २६ जखमी
By admin | Published: September 18, 2016 09:10 AM2016-09-18T09:10:56+5:302016-09-18T09:25:35+5:30
अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरातील इमारतीजवळ स्फोट भाषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २६ जखमी जण जखमी झाल्याची माहीती अमेरिकन मीडियाने दिली आहे
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १८ - अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरातील इमारतीजवळ स्फोट भाषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २६ जखमी जण जखमी झाल्याची माहीती अमेरिकन मीडियाने दिली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सुरुवातीला हा स्फोट गॅसगळतीमुळे झाल्याचा अंदाज होता. मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
या भीषण स्फोटानंतर घटनास्थळाजवळील इमारतीच्या काचाही फुटल्या. स्फोटाचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटाचा आवाजाने संपूर्ण शहर हादरले आहे. मॅनहॅटनमध्ये अंधांसाठी निवास, प्रशिक्षण आणि अन्य सुविधा देण्यासाठी एक केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रापासून जवळच हा भीषण स्फोट झाला आहे.
संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आहे. अंधांच्या केंद्रात अडकलेल्या लोकांना इमारतीबाहेर पडू नका अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तर घटनास्थळाजवळील अन्य दोन इमारतींमधून सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. हा स्फोट कच-याच्या डब्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, काल सकाळी अमेरिकेतील न्यूजर्सीमध्येही पाईप बॉम्बचा स्फोट झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा बॉम्ब जिथे ठेवण्यात आला होता त्या मार्गावरुन मॅरेथॉनमधील स्पर्धक धावणार होते.
Visuals from the spot of explosion in a dumpster in Manhattan New York, injuring at least 26. pic.twitter.com/2OD43FM0Io
— ANI (@ANI_news) September 18, 2016