नायजेरियात स्फोट; ४४ ठार
By Admin | Published: July 6, 2015 11:26 PM2015-07-06T23:26:22+5:302015-07-06T23:26:36+5:30
नायजेरियाच्या मध्यभागातील जोस शहरात गर्दी असलेल्या मशिदीत तसेच एका मुस्लिम उपाहारगृहात जबरदस्त बॉम्बस्फोट झाले.
जोस (नायजेरिया) : नायजेरियाच्या मध्यभागातील जोस शहरात गर्दी असलेल्या मशिदीत तसेच एका मुस्लिम उपाहारगृहात जबरदस्त बॉम्बस्फोट झाले असून, या स्फोटात ४४ जण ठार झाल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
या स्फोटात ६७ जण मरण पावले आहेत. यंताया मशिदीत रमजाननिमित्त आघाडीचे मौलवी शांततेने सहजीवन जगण्याचे प्रवचन देत असताना हा स्फोट झाला आहे. दुसरा बॉम्बस्फोट शागालिंकू या उपाहारगृहात झालेला असून हे उपाहारगृह एका राजकीय नेत्याच्या मालकीचे आहे. (वृत्तसंस्था)