बलुचिस्तानात दर्ग्याबाहेर बॉम्बस्फोट, ४३ ठार, १०० जखमी

By admin | Published: November 12, 2016 09:15 PM2016-11-12T21:15:57+5:302016-11-12T22:56:55+5:30

पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतातील प्रसिद्ध शाह नूरानी दर्ग्याबाहेर शनिवारी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला.

Blasts outside Balochistan, 43 killed and 100 injured | बलुचिस्तानात दर्ग्याबाहेर बॉम्बस्फोट, ४३ ठार, १०० जखमी

बलुचिस्तानात दर्ग्याबाहेर बॉम्बस्फोट, ४३ ठार, १०० जखमी

Next

 ऑनलाइन लोकमत 

बलूचिस्तान, दि. १२ - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील प्रसिद्ध शाह नूरानी दर्ग्याबाहेर शनिवारी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ४३ जण ठार झाले असून १०० हून अधिक नागरीक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 
 
बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यामध्ये हा दर्गा आहे. धमाल या सुफी नृत्याच्या कार्यक्रमासाठी भाविक मोठया संख्येने जमले असताना हा स्फोट झाला. दुर्गम भागात हा दर्गा असून कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 
 
कराचीपासून २५० किमी अंतरावर हा दर्गा आहे. कराची आणि देशाच्या अन्य भागातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात तरीही कुठलीही वैद्यकीय सुविधा इथे उपलब्ध नाही असे स्थानिक तहसीलदार जावेद इकबाल यांनी सांगितले. 
 
 

Web Title: Blasts outside Balochistan, 43 killed and 100 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.