ब्लॉगर हत्याप्रकरणी दोघांना मृत्युदंड

By admin | Published: January 1, 2016 02:05 AM2016-01-01T02:05:05+5:302016-01-01T02:05:05+5:30

बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी दोन विद्यार्थ्यांना मृत्युदंड, तर इतर सहा जणांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली.

Blogger murder case: Death penalty for two | ब्लॉगर हत्याप्रकरणी दोघांना मृत्युदंड

ब्लॉगर हत्याप्रकरणी दोघांना मृत्युदंड

Next

ढाका : बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी दोन विद्यार्थ्यांना मृत्युदंड, तर इतर सहा जणांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली. यात बेकायदा ठरविण्यात आलेल्या अन्सरुल्ला बांगला टीमच्या प्रमुखाचा समावेश आहे.
बांगलादेशात अलीकडेच काही ब्लॉगरची हत्या झाली, या मालिकेतील पहिले ब्लॉगर हैदर होते. या मालिकेतील हा पहिलाच निकाल आहे. न्यायालयाने एका खासगी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी मोहंमद फैसल नईम ऊर्फ द्वीप व फरारी असलेला रिझवानूल आझाद राना या दोघांना मरेपर्यंत फाशी सुनावली. न्यायालयाने अन्सरुल्ला बांगला टीमचा प्रमुख मुफती जशीम उदीन रेहमानी व इतर पाच जणांना दोषी ठरविले.(वृत्तसंस्था)

Web Title: Blogger murder case: Death penalty for two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.