रक्तदाबावरून ठरते मुलगा की मुलगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 01:44 AM2017-01-14T01:44:54+5:302017-01-14T10:09:18+5:30
आईच्या पोटातील गर्भातून मुलगा जन्मणार की मुलगी याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. भारतात त्यावर कायद्याने बंदी असली तरी
टोरांटो : आईच्या पोटातील गर्भातून मुलगा जन्मणार की मुलगी याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. भारतात त्यावर कायद्याने बंदी असली तरी गरोदर व्हायच्या आधी महिलेचा रक्तदाब किती आहे यावरून मुलगा जन्मणार की मुलगी हे सांगता येऊ शकेल.
गरोदर व्हायच्या आधी आईचा रक्तदाब कमी असेल, तर ती मुलगी जन्माला येण्याची शक्यता अधिक असते, असे नव्या अभ्यासात समोर आले आहे. कॅनडातील माऊंट सिनाई हॉस्पिटलमधील डॉ. रवी रत्नाकरन यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांनी यांनी हे संशोधन केले आहे. उच्च रक्तदाब असलेल्या महिलेच्या पोटात मुलगा आकाराला येण्याची जास्त शक्यता असते, असेही अभ्यासातून सूचित होते. कमी रक्तदाबाच्या महिलेची प्रवृत्ती ही मुलीला जन्म देण्याची असते. महिला मुलाला जन्म देणार की मुलीला याच्याशी संबंधित असलेला तिच्या गरोदरपणाच्या आधीचा कमी व उच्च रक्तदाबाचा घटक याआधी विचारात घेण्यात आला नव्हता, असे असे रत्नाकरन म्हणाले.
महिला गरोदर राहिल्यापासून जन्मणारे बाळ हे मुलगा की मुलगी याचा अंदाज व्यक्त करणे हा प्रकार जुनाच आहे. गरोदर महिलेच्या अनेक वैशिष्ट्यांवरून गर्भाचे लिंग मुलगा की मुलगी याच्याशी जोडले जाते. हा अभ्यास फेब्रुवारी २००९ मध्ये सुरू झाला. त्यात चीनच्या लियुयांगमधील ३३७५ महिलांना सहभागी करून घेण्यात आले. त्यातील १,६९२ महिलांचा रक्तदाब, कोलेस्टोरॉल, ट्रिग्लिसेराईड्स आणि ग्लुकोजचा अभ्यास करण्यात आला. ज्या २८१ महिलांमध्ये अगदी सुरुवातीलाच गरोदरपणाची लक्षणे दिसली, त्यांना यातून वगळण्यात आले. प्रत्यक्ष बाळंतपणापासून गर्भधारणेचा कालावधी यासाठी विचारात घेण्यात आला. एकूण १,४११ महिलांचा अभ्यास त्यांच्या गर्भधारणेआधी २६.३ आठवड्यांचा करण्यात आला. त्या महिलांपैकी ७३९ मुलाला आणि ६७२ मुलीला जन्म दिला.
भारतात मात्र अशा प्रकारच्या चाचण्यांना परवानगी नाही. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधाकांनी त्याला मान्यताही दिलेली नाही. सध्या हे संशोधन प्राथमिक पातळीवरच आहे.