डोनाल्ड ट्रम्प यांना तगडा झटका; TikTok वरील बॅन न्यायालयाने हटविला
By हेमंत बावकर | Published: September 28, 2020 09:48 AM2020-09-28T09:48:55+5:302020-09-28T09:51:13+5:30
अमेरिकेमध्ये 19 सप्टेंबरपासून Tiktok, We Chat वर बंदी लादण्यात आली होती. टिकटॉकचे अमेरिकेत 10 कोटी वापरकर्ते आहेत.
वॉशिंग्टन : भारताने दणका दिल्यानंतर अमेरिकेनेही चिनी अॅप Tiktok, We Chat वर बंदी घातली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला तेथील संघीय न्यायालयाने धक्का दिला असून ही बंदी स्थगित केली आहे.
चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले
अमेरिकेमध्ये 19 सप्टेंबरपासून Tiktok, We Chat वर बंदी लादण्यात आली होती. टिकटॉकचे अमेरिकेत 10 कोटी वापरकर्ते आहेत. अमेरिका संघराज्यांच्या न्यायाधिशांनी मध्यरात्रीपासून (Tiktok banned in US) ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या एक आठवड्यानंतर ही बंदी पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या कोलंबिया न्यायालयाचे न्यायाधीश कार्ल निकोलस यांनी नोव्हेंबरमध्ये लागू होणाऱ्या या बंदीवर मात्र स्थगिती देण्य़ास नकार दिला आहे.
TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव
निकोलस यांच्या खंडपीठासमोर रविवारी सकाळी आपत्कालीन सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी टिकटॉकच्या वकिलांनी कंपनीच्या आणि नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची बाजू मांडली होती. तसेच व्यवसायही प्रभावित होणार असल्य़ाचे म्हटले होते. जज यांनी यावर निर्णय जाहीर केला असला तरीही त्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केलेल नाही.
गँगस्टर विकास दुबेचाही वाहन अपघात दाखविण्यात आला होता. दुबेला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. https://t.co/KVHVWJ8ZSX
— Lokmat (@MiLOKMAT) September 28, 2020
ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका?
याबाबत ट्रम्प यांनीच सांगितले होते. टिकटॉकबाबत निर्णय घेण्यासाठी वॉलमार्ट आणि ओरॅकलच्या प्रतिनिधींशी चर्चा करत असल्याचे म्हटले होते. गेल्या महिन्यातच ट्रम्प यांनी या अॅपवर बंधने आणण्यासाठी आदेशावर सह्या केल्या होत्या. यामध्ये या अॅपच्या कंपन्या अमेरिकेतील व्यवसाय स्थानिक कंपन्य़ांना देऊ शकतात असे म्हटले होते. यावेळी मायक्रोसॉफ्ट टिकटॉकसोबत चर्चा करत होता, असे सांगितले जात होते. महत्वाचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा आदेश रविवारपर्यंत मागेही घेण्याची शक्यता होती. कारण टिकटॉकची कंपनी बाईट डान्स अमेरिकेच्या सरकारसोबत तेथीलच कंपन्यांना टिकटॉक विकण्याबाबत बोलत आहेत. यावर सरकारही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
इनोव्हाद्वारे राज्य करणाऱ्य़ा टोयोटाने आता कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेंगमेंटमध्ये पाऊल टाकले आहे. https://t.co/eDC92w6Lau
— Lokmat (@MiLOKMAT) September 28, 2020