ब्लू व्हेल मासे बहुतेक आहेत उजवा हात प्रवृत्तीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:24 AM2017-11-23T04:24:10+5:302017-11-23T04:24:24+5:30
ब्लू व्हेल हा जगात प्राण्यांमध्ये सगळ््यात मोठा असून, तो सामान्यत: अन्नासाठी भक्ष्यावर झडप घालतो
ब्लू व्हेल हा जगात प्राण्यांमध्ये सगळ््यात मोठा असून, तो सामान्यत: अन्नासाठी भक्ष्यावर झडप घालतो, त्या वेळी त्याची उजवी बाजू वापरतो. उजव्या हातांचा वापर करणाºया लोकांसारखेच त्याचे हे वर्तन आहे, असे संशोधकांनी म्हटले. तरीही काही विशिष्ट प्रसंगांत (उथळ पाण्यात वरच्या बाजुने जाताना) हे उजव्या बाजूला पसंती देणारे ब्लू व्हेल मासे आपल्या प्रिय खाद्यावर लक्ष ठेवण्यासाठी बहुतकरून नेहमीच डाव्या बाजूला पसंती देतात. या परिस्थितीचे कारण काय, तर त्यांना तोंडात जास्तीतजास्त अन्न घेता यावे, असे करंट बायोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. आमच्या खात्रीच्या माहितीनुसार समोर कोणते काम आहे, त्याचा विचार करून आपल्या वर्तनात प्राणी वेगवेगळे बदल करतात, त्याचे हे पहिलेच उदाहरण आहे, असे या अभ्यासाचे सहलेखक व स्वीडनमधील स्टॉकहोम विद्यापीठातील जेम्स हर्बर्ट-रीड यांनी म्हटले.