मतदान केले म्हणून बोट कापले

By admin | Published: June 16, 2014 10:41 AM2014-06-16T10:41:22+5:302014-06-16T10:41:48+5:30

अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीत मतदान केले म्हणून तालिबान्यांनी ११ मतदारांचे बोट कापल्याचा धक्कायक प्रकार उघडकीस आला आहे.

The boat cut off as voted | मतदान केले म्हणून बोट कापले

मतदान केले म्हणून बोट कापले

Next
ऑनलाइन टीम
काबूल, दि. १६ - अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीत मतदान केले म्हणून तालिबान्यांनी ११ मतदारांचे बोट कापल्याचा धक्कायक प्रकार उघडकीस आला आहे. जखमींमध्ये ज्येष्ठ मतदारांचा समावेश जास्त असून सध्या त्यांच्यावर अफगाणिस्तानमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
अफगाणिस्तानमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत अब्दूल्ल्ला अब्दूल्ला आणि अशरफ गनी हे अफगाणिस्तामधील दिग्गज नेते राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. यंदा प्रथमच अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तांतरण लोकशाहीपद्धतीने होणार आहे. मात्र तालिबानी दहशतवाद्यांनी या निवडणुकीत अडथळे आणण्याचे उद्योग सुरु केले आहेत. रविवारी अफगाणिस्तानमधील हेरांत प्रांतात मतदान केले म्हणून ११ ज्येष्ठ मतदारांचे बोट कापण्यात आले. ज्या बोटावर मतदान केल्यावर शाई लावली जाते तेच बोट तालिबानी दहशतवाद्यांनी कापून टाकले. अफगाणचे उपगृहमंत्री अयूब सालंगी यांनी ट्विटरद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. सध्या या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सालंगींनी म्हटले आहे. 
अफगाणमधील निवडणुकीत आत्तापर्यंत ५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २२ जुलैपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र तालिबानी दहशतवाद्यांमुळे निवडणूक हिंसक होत आहे. दहशतवाद्यांनी निवडणुकी दरम्यान केलेल्या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाल्याचे अफगाणमधील अधिका-यांनी सांगितले. मतदारांनी मतदानापासून लांब राहावे अशी धमकी तालिबानी देत असून  ६, ३६५ मतदान केंद्रांपैकी २०० मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या कारणास्तव मतदानच होऊ शकले नाही अशी माहिती अफगाणमधील निवडणूक अधिका-यांनी दिली. 

 

Web Title: The boat cut off as voted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.