नेपाळमध्ये सापडले १०० गिर्यारोहकांचे मृतदेह

By admin | Published: May 6, 2015 03:31 AM2015-05-06T03:31:59+5:302015-05-06T03:31:59+5:30

हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या आणखी १०० गिर्यारोहकांचे मृतदेह नेपाळ पोलीस आणि पुनर्वसनाच्या कामात गुंतलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहेत.

The bodies of 100 mountaineers found in Nepal | नेपाळमध्ये सापडले १०० गिर्यारोहकांचे मृतदेह

नेपाळमध्ये सापडले १०० गिर्यारोहकांचे मृतदेह

Next

मृतांचा आकडा ७,५०० पार : बौद्ध स्तूप, मंदिरांमध्ये चोरीच्या शक्यतेने नेपाळ हादरले

काठमांडू : २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपानंतर एव्हरेस्ट शिखरावर झालेल्या मोठ्या हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या आणखी १०० गिर्यारोहकांचे मृतदेह नेपाळ पोलीस आणि पुनर्वसनाच्या कामात गुंतलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहेत. काठमांडूच्या उत्तरेकडे ६० किमीवर असणाऱ्या लांगतांग येथे रविवारी हे मृतदेह सापडले. यातील फक्त दोघांची ओळख पटली आहे.
हे गाव गिर्यारोहकांच्या वहिवाटीवरचे आहे. या गावात गिर्यारोहकांसाठी ५५ गेस्ट हाऊस तसेच इतर सुविधा होत्या़ एव्हरेस्टवर कोसळलेल्या बर्फाच्या दरडीखाली  हे संपूर्ण गाव गडप झाले आहे. बर्फात गाडले गेलेले अजून काही मृतदेह मिळतात काय हे पाहण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक व नेपाळी पोलीस बर्फात सहा फूट खोदत आहेत. पाऊस व ढगाळ हवामानामुळे आम्ही या भागात आधी पोहोचू शकलो नाही, असे लांगतांगचे सहायक जिल्हाधिकारी गौतम रिमल यांनी सांगितले.

575 शाळा पूर्णपणो जमीनदोस्त
नेपाळमधील महाप्रलयंकारी भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भूकंपातील मृतांची संख्या 75क्क् हून अधिक झाली आहे.  
काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूर येथील पुरातन दरबार स्क्वेअरमधील प्रत्येक विटेला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे आता या ठिकाणी असलेल्या ढिगा:यांचे संरक्षण करण्याचे मुख्य काम नेपाळ आर्मी आणि नेपाळ पोलिसांसमोर आहे. असंख्य मूर्ती, दरवाजे, खांब, देवतांच्या मूर्ती, नक्षीकाम केलेले खांब, विटा, लाकडी स्तूप यांची मोजदाद करण्याचे काम नेपाळ सरकारच्या पुरातत्त्व संशोधन विभागाने हाती घेतले आहे. हे काम  सुरू असताना या ठिकाणच्या विटा आणि ढिगा:यांमधून काही वस्तू चोरी होत आहेत. पुरातन महत्त्व असल्याने येथील प्रत्येक विटेला देखील हजारो डॉलर्सचा भाव आला आहे. चोरी करुन या वस्तू नेपाळबाहेर नेण्याचे षडयंत्र तस्करांकडून आखले जात आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांतील दरबार स्क्वेअरच्या परिसरात नागरिकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तिन्ही शहरांमधील दरबार स्क्वेअर नेपाळ आर्मीने ताब्यात घेतले आहेत. 

गिर्यारोहकांचे पथक माघारी
पहिल्या भारतीयाने माउंट एव्हरेस्ट सर केले, त्या अपूर्व घटनेच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने या जगातील सर्वोच्च शिखराच्या चढाई मोहिमेवर गेलेल्या भारतीय लष्कराच्या ३० गिर्यारोहकांच्या पथकाला नेपाळमधील भूकंपामुळे माघारी बोलावण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

भूकंपाच्या धक्क्यानंतर मदतीसाठी आलेली परदेशी पथके आता परतू लागली असून, नेपाळचे पोलीस व लष्कराने भूकंपानंतरच्या पुनर्वसन कार्यक्रमाचा ताबा घेतला आहे. भूकंपामुळे विस्थापित झालेल्या लाखो नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे अवघड काम आता नेपाळी पोलीस व लष्कराला करायचे आहे. नेपाळमधील मृतांची संख्या आता ७,५५७ पर्यंत पोहोचली असून, त्यात ४१ भारतीय आहेत.

नेपाळमध्ये महामारीची भीती
मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असली तरी अजूनही काही मृतदेह नेपाळच्या ग्रामीण भागात ठिगाऱ्यांखाली अडकले असल्याची शक्यता नेपाळी बचाव पथकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उरलेले ढिगारे उपसण्याचे आव्हान या यंत्रणांसमोर आहे. हे लवकर न झाल्यास नेपाळमध्ये महामारी पसरण्याचा मोठा धोका आहे.

अडीच कोटी आणि १०५ वर्षांचा नागरिक
काठमांडूच्या बँक आॅफ काठमांडूचा काही भाग देखील भूकंपात कोसळला होता. या ढिगाऱ्याखालून मदतकार्य करणाऱ्या पथकाने तब्बल अडीच कोटी रुपये बाहेर काढले आहेत. तर नेपाळ पोलिसांनी तब्बल नऊ दिवसांनंतर एका १०५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली आहे.

Web Title: The bodies of 100 mountaineers found in Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.