धक्कादायक! बॉडी बिल्डरचे वयाच्या १९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:17 PM2024-09-04T13:17:14+5:302024-09-04T13:24:58+5:30
ब्राझील येथील प्रसिद्ध बॉडी बिल्डर मॅथ्यू पावलक जगभरात प्रसिद्ध होता. त्याने कमी वयात बॉडी बनवली होती.
ब्राझील येथील प्रसिद्ध बॉडी बिल्डर मॅथ्यू जगभरात प्रसिद्ध होता. त्याने कमी वयात बॉडी बनवली होती. या आधी मॅथ्यू लठ्ठपणाने त्रस्त होता. त्यानंतर ५ वर्षांत शरीरात मोठे बदल घडवून जगभर प्रसिद्ध झाला. आज मॅथ्यूज पावलक यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी मॅथ्यूजला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना प्राण गमवावे लागले. ब्राझीलचा रहिवासी असलेला मॅथ्यूज बॉडी बिल्डर म्हणून जगभर प्रसिद्ध होता.त्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. एवढ्या कमी वयात बॉडी बनवल्यामुळे तो जगभर प्रसिद्ध झाला होता.
रशियासोबतच्या युद्धामुळे झेलेन्स्की यांच्या अडचणी वाढल्या, ५ मंत्र्यांनी दिले राजीनामे
काही दिवसापूर्वीच त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तर U23 स्पर्धाही जिंकली. पावलकचा मृत्यू स्टिरॉइड्समुळे झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावरील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पावलकने तब्येत सुधारण्यासाठी अनेक औषधांचा वापर केला होता. त्यामुळे त्यांना तब्येतीची समस्या येऊ लागली आणि शेवटी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
पावलक सतत त्याच्या शरीरातील परिवर्तनाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. अलीकडेच त्याने स्वतःचा एक फोटो शेअर करताना लिहिले की, 'तुमचे स्वप्न किती कठीण आणि अशक्य आहे हे महत्त्वाचे नाही. जर तुम्हाला हे खरोखर करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मी हे केले. मॅथ्यू पावलाकचे माजी प्रशिक्षक लुकास शेगाटी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
इंस्टाग्रामवर शेगाटीने लिहिले की, 'आजचा दिवस खूप दुःखाचा आहे. आम्ही आमचा एक चांगला मित्र गमावला. त्यांच्या निधनाने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. एक सन्माननीय खेळाडू म्हणून उज्ज्वल भविष्य त्याची वाट पाहत होते. मात्र त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. देवाची स्वतःची योजना आहे, पण ते समजणे कठीण आहे. माझ्या मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.