रोमॅंटिक डेटदरम्यान महिलेवर व्यक्तीने केला हल्ला, तोडलं तिचं नाक आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:38 PM2022-05-31T16:38:53+5:302022-05-31T16:39:32+5:30
भेटीदरम्यान बॉडी बिल्डरने महिलेच्या डोक्यावर दारूची बॉटल मारली. इतकंच नाही तर त्याने तिला पायाने दाबण्याचाही प्रयत्न केला.
ब्लाइंड डेटवर गेलेल्या एका बॉडी बिल्डरने भेटायला आलेल्या महिलेवर हल्ला केला. ब्लाइंड डेट म्हणजे दोघांना आधीपासून एकमेकांबाबत काही माहीत नव्हतं. त्यांच्या एका दुसऱ्या मित्राने ही डेट ऑर्गनाइज केली होती. पण या पहिल्याच भेटीत महिलेसोबत तो असं वागला की, तिला धक्का बसला.
भेटीदरम्यान बॉडी बिल्डरने महिलेच्या डोक्यावर दारूची बॉटल मारली. इतकंच नाही तर त्याने तिला पायाने दाबण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात महिलेचं नाक तुटलं आणि गंभीर जखमीही झाली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या घटनेबाबत बॉडी बिल्डर डॅरिल क्रॉफर्ड याला तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॅरिल क्रॉफर्ड या महिलेला आधी भेटला नव्हता.
डॅरिल म्हणाला होता की, महिलेने त्याचा अपमान केला होता. ज्यानंतर त्याला राग आला होता. मात्र, कोर्टात सुनावणी दरम्यान प्रकरण वेगळंच निघालं. ही घटना गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घडली होती. याप्रकरणी ३२ वर्षीय डॅरिल क्रॉफर्डला आता तुरूंगात पाठवलं आहे. त्याने कोर्टात महिलेला गंभीर शारीरिक इजा केल्याचं स्वीकार केलं.
Hull Crown Court मध्ये सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, डॅरिल रात्री ११ वाजता महिलेच्या घरी पोहोचला होता. पण जेव्हा त्याने महिलेसोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळं बिघडलं. आधी तो भरपूर दारू प्यायला आणि मग तिच्यावर जबरदस्ती करू लागला.
डॅरिलकडे वोडकाची एक बॉटल होती. जी त्याने महिलेच्या डोक्यावर मारली होती. इतकंच नाही तर त्याने महिलेला लाथेनेही मारलं आणि केस धरून ओढत नेलं होतं. यादरम्यान डॅरिल आणि पीडितेशिवाय त्यांची ब्लाइंड डेट ऑर्गनाइज करणारी आणखी एक महिलाही तिथे उपस्थित होती.
कोर्टात सांगण्यात आलं की, डॅरिल याआधी चोरी, चाकूने हल्ला, गंभीर शारीरिक नुकसान पोहोचवणे यांसारख्या केसेसमध्ये सहभागी होता. न्यायाधीशांनी त्याला एक खतरनाक गुन्हेगार म्हटलं आणि ६ वर्षांची शिक्षा सुनावली.