बोको हरामच्या दहशतवाद्यांचा चीनच्या प्रकल्पावर हल्ला
By admin | Published: May 17, 2014 10:43 PM2014-05-17T22:43:14+5:302014-05-17T22:43:14+5:30
नायजेरियातील बोको हराम दहशतवाद्यांनी कॅमेरूनमधील वाझा शहरातील चीनच्या प्रकल्पावर हल्ला चढविल्याने खळबळ उडाली आहे.
Next
>अबुजा : नायजेरियातील बोको हराम दहशतवाद्यांनी कॅमेरूनमधील वाझा शहरातील चीनच्या प्रकल्पावर हल्ला चढविल्याने खळबळ उडाली आहे. प्रांताचे गव्हर्नर ऑगस्टीन फोंका अवा यांनी हल्ल्याच्या घटनेला पुष्टी दिली; परंतु त्याची सविस्तर माहिती मात्र दिली नाही. या घटनेत एक जण जखमी झाला, तर इतर 1क् जणांना किरकोळ जखमा झाल्याचे अनधिकृत सूत्रंनी सांगितले.
दहशतवाद्यांनी कॅमेरूनच्या उत्तर भागात अनेक वेळ हल्ले चढविले आहेत. मागील महिन्यात त्यांनी पोलीस चौकीवर हल्ला करून 2 जणांना ठार केले होते, तर फेब्रुवारी 2क्13 मध्ये एका फ्रेंच कुटुंबाचे अपहरण केले होते. नायजेरियाच्या सीमेपासून वाझा हे शहर 2क् किलोमीटर अंतरावर आहे. संबिसा जंगलाजवळील हा परिसर असून, तो बोको हराम दहशतवाद्यांचा प्रमुख अड्डा मानला जातो. या दहशतवाद्यांनी नायजेरियात मागील 5 वर्षामध्ये हजारो लोकांना यमसदनी पाठवले आहे. संपूर्ण क्षेत्र अस्थिर करणो, हेच त्यांचे मुख्य लक्ष्य आहे. दहशतवाद्यांनी 223 शाळकरी मुलींचे अपहरण केल्याचे स्थळ या संबिसा जंगलापासून नजीकच आहे.
सुरक्षेवर विशेष परिषद
बोको हरामच्या वाढत्या उच्छादाबाबत विचारविनिमय करण्यासाठी फ्र ान्सच्या नेतृत्वात विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष फ्र ान्कोईस होलांडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होत आहे. नायजेरियाच्या शेजारील राष्ट्रांचे नेतेही यात सहभागी होत आहेत. यामध्ये बेनिन, कॅमेरून, नायगर आणि छाड यांचा समावेश आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय संघाचे प्रतिनिधीही यावेळी हजर राहण्याची शक्यता आहे. बोको हरामच्या कारवायांमुळे सुरक्षा व्यवस्थेला निर्माण झालेल्या धोक्याबाबत या परिषदेत व्यूहरचना करण्यात येणार आहे.
पश्चिम आणि मध्य आफ्रि केत बोको हराममुळे अशांतता निर्माण झाली आहे. होलांडे यांनी या विषयावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली आहे. (वृत्तसंस्था)
- बोको हरामने अपहरण केलेल्या 223 मुलींची सुखरूप सुटका, हेच अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याकामी विशेष पथके व ड्रोन विमाने परिसर पिंजून काढत आहेत, असे व्हाईट हाऊसने सांगितले. फ्र ान्सनेही या शोधसत्रत उडी घेतली.
- नायजेरियानेही आपले तज्ज्ञ उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, हे तज्ज्ञ, अधिकारी अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार अमेरिकेच्या पथकाने केली आहे.