‘बोको हराम’च्या म्होरक्याचा खात्मा
By Admin | Published: September 26, 2014 05:09 AM2014-09-26T05:09:39+5:302014-09-26T05:09:39+5:30
नायजेरिया लष्कर आणि अतिरेक्यांदरम्यान झालेल्या चकमकीत ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेचा नेता अबुबकर शेकौ मारला गेल्याचा दावा नायजेरियन लष्कराने केला
मैैदुगुरी/अबुजा : नायजेरिया लष्कर आणि अतिरेक्यांदरम्यान झालेल्या चकमकीत ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेचा नेता अबुबकर शेकौ मारला गेल्याचा दावा नायजेरियन लष्कराने केला आहे. शेकौ मारल्या गेल्याने बोको हराम संघटनेच्या १३५ सदस्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करल्याचेही नायजेरियन लष्कराने सांगितले.
गेल्या पाच वर्षांपासून बोको हराम या संघटनेने हजारो लोकांची हत्या करून भयानक दहशत निर्माण केली आहे. पाश्चात्त्य शिक्षणाला या संघटनांचा कडाडून विरोध आहे. गेल्या काही महिन्यांत या संघटनेने भयानक घातपाती कारवाया केल्या. एप्रिलमध्ये २०० शाळकरी मुलांच्या अपहरणांतर चर्चेत आलेल्या अबुबकर शेकौने २००९ मध्ये मोहंमद युसूफच्या मृत्यूनंतर या संघटनेची धुरा हाती घेतली होती. ही संघटना नायजेरिया इस्लामी कायदा लागू करण्याबाबत आग्रही आहे.(वृत्तसंस्था)