बांग्लादेशमध्ये नमाजादरम्यान बॉम्बस्फोट, 4 ठार 12 जखमी

By Admin | Published: July 7, 2016 10:24 AM2016-07-07T10:24:57+5:302016-07-07T15:24:09+5:30

ढाक्यापासून काही अंतरावर असलेल्या किशोरगंजमध्ये नमाजादरम्यान बॉम्बस्फोट झाला असून १ पोलीस शहीद तर ५ जण जखमी झाले.

Bomb blast in Bangladesh, 4 killed in 12 injured in Bangladesh | बांग्लादेशमध्ये नमाजादरम्यान बॉम्बस्फोट, 4 ठार 12 जखमी

बांग्लादेशमध्ये नमाजादरम्यान बॉम्बस्फोट, 4 ठार 12 जखमी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

ढाका, दि. ७ - ढाका येथील रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करत केलेल्या नृशंस हत्याकांडाला आठवडाही उलटत नाहीत तोच बांग्लादेश पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरला. ढाक्यापासून १०० किमी अंतरावर  असलेल्या किशोरगंज येथे गुरूवारी सकाळी ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नमाजादरम्यानच बॉम्बस्फोट झाला व त्यामध्ये दोन पोलीस, एक हल्लेखोर व एक महिला ठार झाली आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. एकूण तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले, तर दोघांना पकडण्यात यश आले आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदनिमित्त बांगलादेशातील किशोरगंज येथील शोलकिया ईदगाह मैदानात धार्मिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळ नमाज पठणासाठी सुमारे ३ लाख नागरिक घटनास्थळी जमले होते. त्या सभेत मुख्य नमाजादरम्यान प्रवेशद्वाराजवळच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला आणि एकच गोंधळ माजला. या स्फोटात दोन पोलिसांनी प्राण गमावले आहेत तर सुमारे १२ जण जखमी झाले, जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. स्फोटानंतर दहशतवादी जवळच्याच एका घरात लपून बसले असून पोलिस व दहशतवाद्यांदरम्यान जोरदार चकमक झाली ज्यामध्ये एका दहशतवाद्यांला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. दोघा दहशतवाद्यांना पोलीसांनी जिवंत पकडल आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

दरम्यान, बांगलादेशचे माहिती व प्रसारण मंत्री हसनुल हक यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यासाठीच त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. हा राजकीय हल्ला असून, याचा धर्माशी काहीही संबंध नाही. 

बांग्लादेशची राजधानी ढाका येथील रेस्टॉरंटमध्ये गेल्याच आठवड्यात ८-ते १० दहशतवाद्यांनी हल्ला करत २० हून अधिक नागरिकांना ठार केले. ढाका येथील परदेशी दूतावास, वकिलांतीची कार्यालये असलेला, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहात दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात हल्ला केला होता. पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर एकाला जिवंत पकडले.

 

 

Web Title: Bomb blast in Bangladesh, 4 killed in 12 injured in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.