तुर्कीत बॉम्बस्फोट, २७ जण ठार
By admin | Published: July 20, 2015 05:35 PM2015-07-20T17:35:28+5:302015-07-20T17:35:28+5:30
तुर्कीच्या दक्षिण भागात असलेल्या सुरुक शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात २७ जण ठार झाले असून १०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Next
>लोकमत ऑनलाइन
तुर्की, दि. २० - तुर्कीच्या दक्षिण भागात असलेल्या सुरुक शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात २७ जण ठार झाले असून १०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
सुरुकमधील सांस्कृतिक सेंटरमध्ये हा बॉम्बस्फोट करण्यात आला. यावेळी या सेंटरमध्ये अनेक लोक उपस्थित होते. या स्फोटात आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृत्यांचा संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुरुक शहर हे सिरीयाच्या सीमेगलत असून सिरीयाच्या कोबाने शहरापासून फक्त सहा मैल अंतरावर आहे. गेल्या महिन्यातच कोबाने शहरात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यावेळी २०० हून अधिक जण ठार झाले होते.
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही आहे.