लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 16 ठार

By Admin | Published: February 13, 2017 07:36 PM2017-02-13T19:36:21+5:302017-02-13T21:37:38+5:30

पाकिस्तानमधील लाहोर येथे असलेल्या पंजाब विधानसभेजवळ बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात दोन पोलीस अधिका-यांसह 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Bomb blasts in Lahore, 16 killed | लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 16 ठार

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 16 ठार

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 13 - पाकिस्तानमधील लाहोर येथे असलेल्या पंजाब विधानसभेजवळ बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात दोन पोलीस अधिका-यांसह 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 
 
पाकिस्तानच्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोर मॉल रोड परिसरात पंजाब विधानसभेजवळ हा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात दोन पोलीस अधिका-यांसह दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उपमहानिरीक्षक (वाहतूक) मुबीन आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक झाहिद मेहमूद अशी या  दोन मृत पोलीस अधिका-यांची नावे सांगण्यात येत आहेत. 
 
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 
 

Web Title: Bomb blasts in Lahore, 16 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.