अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:38 AM2024-10-07T07:38:40+5:302024-10-07T07:39:18+5:30

बलुचिस्तान नॅशनल आर्मी या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आपल्या नागरिकांनी पाकिस्तानात सावध रहावे, म्हणून अमेरिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Bomb blasts outside Karachi airport after US advisory; Death of two foreign nationals | अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

आपल्या नागरिकांनी पाकिस्तानात सावध रहावे, म्हणून अमेरिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इराण आणि पाकिस्तानची सीमा लागून असल्याने तसेच इस्रायल-इराण युद्ध झाले तर त्याचे पडसाद आपल्या नागरिकांवर उमटण्याची शक्यता असल्याने अमेरिकेने ही अ‍ॅडवायझरी जारी केली होती. यानंतर लगेचच कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. यात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या महिन्यातच चीनने पाकिस्तानला आपले सैन्य तैनात करण्यासाठी दबावाखाली आणले होते. चिनी नागरिकांवर हल्ले होत असल्याने पाकिस्तानमधील प्रकल्पांवर कामाला असलेल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी चीन आपले सैन्य तैनात करणार आहे. चिनी नागरिकांना बलुचिस्तानी संघटना लक्ष्य करत आहेत. रविवारी झालेला हल्ला हा देखील याचाच एक भाग होता. 

बीबीसीच्या वृत्तानुसार या स्फोटात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला. तर चिनी दुतावासानुसार यात अनेक पाकिस्तानी कर्मचारी मारले गेले आहेत. एकूण मृत्यूंची संख्या स्पष्ट झालेली नाही. सिंध प्रांतातील वीज निर्मिती प्रकल्पावर काम करत असलेल्या चिनी इंजिनिअरच्या ताफ्यावर बॉम्ब फेकण्यात आले, असे दुतावासाने म्हटले आहे. 

बलुचिस्तान नॅशनल आर्मी या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.  कराची विमानतळावरून येणारे चीनी अभियंते आणि गुंतवणूकदारांच्या उच्चस्तरीय ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. अभियंते चीन-अनुदानित पोर्ट कासिम पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडचे ​​कर्मचारी होते. हा प्लांट चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. शहरातील अनेक भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला असल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे. 

Web Title: Bomb blasts outside Karachi airport after US advisory; Death of two foreign nationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.