अमेरिकेवर पडला ‘बाॅम्ब सायक्लाेन’, थांबली ‘महाशक्ती’; सुमारे ६० टक्के जनतेला बसला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:51 AM2022-12-25T11:51:02+5:302022-12-25T11:51:33+5:30

थाेडे थाेडके नव्हे तर तब्बल २० काेटी लाेक या थंडीच्या कचाट्यात सापडले आहेत.

bomb cyclone on america stopped mahashakti about 60 percent of people were affected | अमेरिकेवर पडला ‘बाॅम्ब सायक्लाेन’, थांबली ‘महाशक्ती’; सुमारे ६० टक्के जनतेला बसला फटका 

अमेरिकेवर पडला ‘बाॅम्ब सायक्लाेन’, थांबली ‘महाशक्ती’; सुमारे ६० टक्के जनतेला बसला फटका 

Next

न्यूयाॅर्क : उकळणारे पाणी हवेत फेकले आणि काही क्षणातच ते गाेठले. ऐकायला विचित्र वाटेल. परंतु, अमेरिकेला अशा भीषण आणि अक्षरश: हाडे गाेठविणाऱ्या थंडीने गुडघ्यावर आणले आहे. थाेडे थाेडके नव्हे तर तब्बल २० काेटी लाेक या थंडीच्या कचाट्यात सापडले आहेत. हा प्रकार आहे ‘बाॅम्ब सायक्लाेन’चा. सुमारे १२ जणांचा त्यात मृत्यू झाला आहे.

हिवाळ्यात अमेरिकेमध्ये बर्फवृष्टी हाेते. मात्र, यावेळी बर्फाच्या वादळाचा तडाखा बसला आहे. मोन्टाना शहरात तापमान -६० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. पाणी शून्य अंशावर गाेठते. त्यावरून या तापमानचा अंदाज येईल. अनेक शहरांमध्ये अशी बिकट परिस्थिती आहे.  (वृत्तसंस्था)

‘बाॅम्ब सायक्लाेन’ म्हणजे काय?

- हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वादळादरम्यान वातावरणातील हवेचा दाब प्रचंड वेगाने कमी हाेताे. त्यावेळी ‘बाॅम्ब सायक्लाेन’ची स्थिती निर्माण हाेते. 
- मुसळधार पाऊस किंवा प्रचंड बर्फवृष्टी यामुळे हे हाेते. अमेरिकेत प्रचंड बर्फवृष्टी झाली आहे. 
उकळत्या पाण्याचे चॅलेंज
- कडाक्याच्या थंडीमध्येही लाेकांनी साेशल मीडियावर उकळत्या पाण्याचे चॅलेंज हा ट्रेंड सुरू केला आहे. 
- उकळते पाणी हवेत फेकल्यानंतर काही क्षणातच त्याचा बर्फ झाल्याचे व्हिडीओ लाेकांनी साेशल मीडियावर पाेस्ट केले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bomb cyclone on america stopped mahashakti about 60 percent of people were affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.