अफगाणिस्तानमध्ये मशिदीजवळ बॉम्बस्फोट, दहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 06:59 PM2017-06-06T18:59:48+5:302017-06-06T18:59:48+5:30

अफगाणिस्तानमधील पश्चिमेकडील प्रांत असलेल्या हेरामध्ये एका मशिदीजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

A bomb exploded near a mosque in Afghanistan, ten dead | अफगाणिस्तानमध्ये मशिदीजवळ बॉम्बस्फोट, दहा ठार

अफगाणिस्तानमध्ये मशिदीजवळ बॉम्बस्फोट, दहा ठार

Next
ऑनलाइन लोकमत
हेरात, दि. 06-  अफगाणिस्तानमधील पश्चिमेकडील प्रांत असलेल्या हेरामध्ये एका मशिदीजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
येथील स्थानिक मिडियाने दिलेल्या माहितीनुसार, हेरातमधील जाम- ए- मशिदीजवळ दहशतवाद्यांनी हा शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. 
याचबरोबर, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या भारतीय गेस्टहाऊसच्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट कोसळल्याची घटना आजच घडली. ही घटना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. भारतीय राजदूत मनप्रीत व्होरा यांच्यासह आणखी काही भारतीय दूतावासातील अधिकारी या परिसरात राहतात. मात्र, या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याची माहिती देण्यात आली नसून भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात काबूलमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यामध्ये 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर 300 पेक्षा जास्त जखमी झाले. या घटनेनंतर येथील विदेश दूतावास परिसरात सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. तसेच, या स्फोटामुळे भारतीय दूतावासाच्या इमारतीचे थोडे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ईराणी दूतावासाला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला.मात्र अजून कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. याच परिसरात अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे निवासस्थानही आहे. 
 

Web Title: A bomb exploded near a mosque in Afghanistan, ten dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.