अफगाणिस्तानमध्ये मशिदीत स्फोट, २० ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 11:10 PM2017-08-01T23:10:57+5:302017-08-02T00:28:30+5:30

अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील मशिदीत झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात 20 जणांचा जागीज मृत्यू झाला आहे

Bomb explosions in Afghanistan, 20 deaths | अफगाणिस्तानमध्ये मशिदीत स्फोट, २० ठार

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत स्फोट, २० ठार

Next

काबूल, दि. 1 -  एका प्रार्थनास्थळात आत्मघाती हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार तर ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार, हा हल्ला रात्री ८ वाजता झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही  संघटनेने स्वीकारलेली नाही.  जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मिळालेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील मशिदीत मंगळवारी रात्री शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 30 जण जखमी झाले आहेत. मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, काल रात्री अफगाणिस्तानची राजधानी काबलुमध्ये इराकच्या दूतावासावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं दूतावासाच्या परिसरात स्वत:ला उडवून दिलं. यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला सुरु झाल्यानंतर चार तासानंतर सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेनं स्विकारली आहे.

 

Web Title: Bomb explosions in Afghanistan, 20 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.