बँकॉक-मुंबई विमानात बॉम्बची फसवी धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 09:55 PM2016-03-16T21:55:17+5:302016-03-16T21:55:17+5:30
एअर इंडियाच्या बँकॉकहून मुंबईला निघणारे AI322 या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या वृत्तामुळे विमानात आणि विमानतळावर घबराट उडाली होती. हे विमान बँकॉकहून रात्री साडेआठ वाजता उड्डाण करणार होते.
Next
ऑनलाइन लोकमत
बँकॉक, दि. १६ - एअर इंडियाच्या बँकॉकहून मुंबईला निघणारे AI322 या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या वृत्तामुळे विमानात आणि विमानतळावर घबराट उडाली होती. हे विमान बँकॉकहून रात्री साडेआठ वाजता उड्डाण करणार होते. त्यामुळे सर्व प्रवासी आतमध्ये बसले होते. मात्र बॉम्बच्या धमकीमुळे सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. संबंधित विमान बँकॉक विमानतळावरील निर्मनुष्य भागात नेण्यात आले होते, तेथील बॉम्बशोधक पथकाने विमानात जाऊन तपास घेतला असता विमानात त्यांना कोणतीही स्फोटके सापडली नाहीत.
बँकॉकवरुन मुंबईकडे निघण्यासाठी विमान उड्डान घेण्यापुर्वीच दिल्लीवरुन विमानात २ बॉम्ब असल्याचा फोन आला. बॉम्बनाशक पथकाकडून विमानाची तपासणी केल्यानंतर एयर इंडियाचे AI322 विमानाने सुखरुप उड्डान केले असून, विमानात एकही बॉम्ब नाही, विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
Flight landed safely at Bangkok airport & taken to isolation. All 231 passengers were safely evacuated: Air India
— ANI (@ANI_news) March 16, 2016