रॉ एजंट होती पुतिन यांची गर्लफ्रेन्ड, संसद हल्ल्यावरील नव्या पुस्तकात दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:22 PM2020-08-18T16:22:54+5:302020-08-18T16:27:36+5:30

या पुस्तकाचे लेखक यतीश यादव यांनी रॉ च्या एका सीक्रेट मिशनबाबत अनेक खुलासे केले आहेत. तसेच हे पुस्तक मुख्यत्वे संसदेवरील हल्ल्याबाबत खुलासे करतं.

Book claims R&AW recruited Vladimir Putin's ex-girlfriend | रॉ एजंट होती पुतिन यांची गर्लफ्रेन्ड, संसद हल्ल्यावरील नव्या पुस्तकात दावा!

रॉ एजंट होती पुतिन यांची गर्लफ्रेन्ड, संसद हल्ल्यावरील नव्या पुस्तकात दावा!

Next

जगातल्या सर्वात शक्तीशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन हे रशियातील गुप्तचर संघटना 'केजीबी'चा भाग होते. ८० च्या दशकात भारतीय गुप्तचर संघटना रॉ रशियाच्या केजीबीच्या बरीच पुढे निघून गेली होती. याबाबतचा खुलासा RAW, history of Indies covert operations या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक यतीश यादव यांनी रॉ च्या एका सीक्रेट मिशनबाबत अनेक खुलासे केले आहेत. तसेच हे पुस्तक मुख्यत्वे संसदेवरील हल्ल्याबाबत खुलासे करतं.

या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, ८०च्या दशकात रॉ ने रशियातील दोन लोकांना आपलं सीक्रेट एजन्ट केलं होतं. रॉ च्या या दोन्ही सीक्रेट एजन्ट्सचा त्यावेळचे परराष्ट्र मंत्री एडवर्ड एम्ब्रोसिएविच शेवार्डनाड्ज आणि रशियाचे सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी कनेक्शन होतं.

या पुस्तकात यतीश यादव यांनी रॉ चे एक ऑफिसर अशोक खुराणाबाबत सांगितले आहे. ज्यांनी जवळपास एक दशकापर्यंत चाललेल्या एका सीक्रेट ऑपरेशनसाठी सोव्हिएतच्या गुप्तहेरांना तयार केलं होतं. या पुस्तकात कोणत्याही व्यक्तीच्या खऱ्या नावाचा खुलासा नाहीये. सर्वांचे कोडनेम आहेत. तरी सुद्धा यातून हे समजून येतं की, या दोन गुप्तहेरांपैकी एक एडवर्ड शेवार्डनाड्जेचा भाऊ होता. तर रॉसाठी काम करणारी दुसरी गुप्तहेर व्लादिमीर पुतिनची गर्लफ्रेन्ड होती.

याची सुरूवात नोव्हेंबर १९८८ मध्ये झाली होती. जेव्हा सोव्हिएत यूनियनचे राष्ट्राध्यक्ष मिखाइल गोर्बाशेव भारत दौऱ्यावर आले होते. याबाबत यादव यांनी लिहिले की, 'रॉ चे अशोक खुराणाची भेट एलेक्जेंड्रे नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. हा रशियातील एका मोठ्या नेत्याचा भाऊ होता. जो या दौऱ्यावर गोर्बाशेवसोबत भारतात आला होता. या दौऱ्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री एडवर्ड शेवार्डनाड्जेसोबत होते.

यतीश यादव यांनी लिहिले की, काही महिन्यांनी अशोक खुराणाच्या संपर्कात एलेक्जेंड्रेसोबतच अनास्तासिा कोर्किया सुद्धा आली. अनास्तासिया त्यावेळी 'एलेक्सी' डेट करत होती. जे गुप्तचर संस्था FSB मध्ये वरच्या पदावर होता. अशोक खुराणा या दोघांच्या संपर्कात सतत होते.

वर्ष १९८९ मध्ये शेवटच्या सहा महिन्यात एलेक्जेंड्रे आणि अनास्तासिया दोघेही रॉ एजन्टच्या रूपात काम करायला तयार झाले होते. जून १९९० मध्ये बर्लिनची भिंत पडण्याच्या काही महिन्यांआधीच अशोक खुराणाने अमेरिका आणि सोव्हिएतच्या यूनायटेड जर्मनीसाठी तयार केलेला रोडमॅप तयार केला होता. त्यानंतर ऑपरेशन Azalea ची सुरूवात झाली.

या ऑपरेशनमधून रॉ ला बरीच महत्वाची आणि गुप्त माहिती मिळाली. अमेरिका-सोव्हिएतचा जर्मनी रीयूनिफिकेशनचा प्लॅन, न्यूक्लिअर टेस्टिंगवर रशियाची योजना, दहशतवाद्यांविरोधात योजना आणि मॉस्कोचा चीन आणि पाकिस्तानकडे वाढतं पाउलसारखी माहिती होती.

यादव यांनी या पुस्तकात अनास्तासिया कोर्कियाच्या ज्या बॉयफ्रेन्डचा उल्लेख केलाय. तो FSB मध्ये मोठ्या पदावर होता. ज्याने २००० मध्ये प्रमोटेड होण्याआधी १९९९ मध्ये रशियाच्या प्रकरणांचं संचालन केलं. या गोष्टी रशियाचे आताचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फार मॅच होतात. पुतिन १९९८-१९९९ मध्ये FSB चे प्रमुख होते. १९९९ मध्ये ते रशियाचे पंतप्रधान होते आणि २००० मध्ये त्यांनी राष्ट्रपतीचा पदभार सांभाळला.

हे पण वाचा:

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेसाठी अयोग्य अध्यक्ष; मिशेल ओबामांचा हल्लाबोल

संपूर्ण जगाला चिंतेत टाकून चीन काय करतोय पाहा; संताप आल्यावाचून राहणार नाही

Web Title: Book claims R&AW recruited Vladimir Putin's ex-girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.