पुस्तके वाचाल, तर अधिक जगाल

By admin | Published: August 7, 2016 01:48 AM2016-08-07T01:48:40+5:302016-08-07T01:48:40+5:30

पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते हे तुम्ही ऐकले असेल; परंतु पुस्तक वाचनाचा आणखी एक फायदा समोर आला आहे. तो समजल्यानंतर एरवी पुस्तक समोर येताच डुलकी लागणारे महाभागही

The books will be read, the more the zodiac | पुस्तके वाचाल, तर अधिक जगाल

पुस्तके वाचाल, तर अधिक जगाल

Next

लंडन : पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते हे तुम्ही ऐकले असेल; परंतु पुस्तक वाचनाचा आणखी एक फायदा समोर आला आहे. तो समजल्यानंतर एरवी पुस्तक समोर येताच डुलकी लागणारे महाभागही नित्यनेमाने त्यांचे वाचन करू लागतील. चांगल्या पुस्तकाचे तल्लीनतेने वाचन करण्याने आयुष्य वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
येल विद्यापीठाने हा अभ्यास केला. अभ्यासकांनी ३५०० हून अधिक महिला तसेच पुरुषांचे आरोग्य आणि त्यांच्या सवयींचा सलग १२ वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. चांगली कथा वाचल्याने मेंदू सक्रीय राहून तणावापासूनही मुक्ती मिळते, असे अमेरिकन संशोधकांना आढळून आले आहे. दररोज ३० मिनिटे वाचन करण्याची सवयही उपयुक्त ठरू शकते. दैनिके व नियतकालिकांपेक्षा पुस्तक वाचनाने बुद्धी अधिक सक्रीय रहाते आणि त्यामुळे आयुष्य वाढते, असे या संशोधकांनी सांगितले. अभ्यासाच्या प्रारंभी किमान ५० वर्षे वयाच्या लोकांना तुम्ही पुस्तके, वृत्तपत्रे व नियतकालिकांचे नियमित वाचन करता का, करत असल्यास वाचनाला किती वेळ देता, तुमचे आरोग्य कसे आहे आणि तुम्ही विद्यापीठात शिक्षण घेतले आहे काय, यासारखे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. या अभ्यासात वाचन करणाऱ्या लोकांच्या तुलनेत वाचनाची आवड असणारे लोक अधिक काळ जगल्याचे आढळले. या अभ्यासाचे निष्कर्ष सोशल सायन्स अ‍ॅण्ड मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अभ्यासादरम्यान पुस्तकांचे वाचन करणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतरांच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी कमी राहिले. वेगवेगळ््या शैलीचे पुस्तक वाचण्याचा वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. यापूर्वीच्या एका संशोधनात पुस्तक स्क्रीनवर वाचण्याऐवजी कागदावर आणि शाहीने लिहीलेला मजकूर वाचणे अधिक फायद्याचे असते, असे आढळले होते. (वृत्तसंस्था)

संशोधक बेक्का लेवी यांनी सांगितले की, ६५ वर्षांहून अधिक वयाचे लोक दररोज साडेचार तास टीव्ही पाहतात. हा वेळ पुस्तक वाचनात व्यतित करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते. दैनंदिन सवयींत पुस्तक वाचनाला समावेश करणे फायद्याचे आहे.

Web Title: The books will be read, the more the zodiac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.