हॅरी पॉटरच्या जन्मकथेशी या बुकस्टोरचा संबंध, प्रवेशासाठीच लागतात 300 रूपये
By Admin | Published: July 4, 2017 05:14 PM2017-07-04T17:14:48+5:302017-07-04T17:14:48+5:30
जेथे पुस्तके विकत घेऊन वाचण्याची मारामार तेथे पोर्तो शहरातील एक सर्वात जुने पुस्तकालय आत प्रवेश देण्यासाठीच 4 युरो म्हणजे जवळ जवळ 300 रुपये प्रवेश शुल्क आकारते असे सांगितले तर खरे वाटणार नाही.
राजू नायक / ऑनलाइन लोकमत
पोर्तो ( पोर्तुगाल), दि. 4 - जेथे पुस्तके विकत घेऊन वाचण्याची मारामार तेथे पोर्तो शहरातील एक सर्वात जुने पुस्तकालय आत प्रवेश देण्यासाठीच 4 युरो म्हणजे जवळ जवळ 300 रुपये प्रवेश शुल्क आकारते असे सांगितले तर खरे वाटणार नाही.
या पुस्तक भांडाराचे नाव लेलो आणि इर्मांव असे असून लोनली प्लॅनेट ने जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सुंदर ग्रंथदालन असे संबोधून त्याचा गौरव केला आहे. परंतु तेवढ्या साठीच ते लोकप्रिय नाही. त्याचे खरे कारण हॅरी पॉटरच्या जन्मकथेचा या बुकस्टोरशी संबंध आहे.
हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोवलिंग ह्यांचे पूर्वाश्रमीचे पतीला भेटण्यासाठी त्या ह्या बुकस्टोर मध्ये येत. सांगण्यात येते रोवलिंग ह्यांना हॅरी पॉटर लिहण्याची स्फुर्ती पोर्तो मध्येच , विशेषतः ह्या बुकस्टोरमधेच मिळाली.
आतमध्ये हॅरी पॉटर पुस्तकाचे एक स्वतंत्र दालन आहे. स्टोरमध्ये पोर्तुगीज आणि इतर भाषांतील असंख्य पुस्तके आहेत. ह्या स्टोरमध्ये फिरणेच एक गमतीदार अनुभव असतो.