बापरे! अल्पवयीन मुलाचा भयंकर कारनामा; थेट सरकारची फसवणूक करून लुटले तब्बल 46 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:49 AM2022-06-04T11:49:27+5:302022-06-04T11:49:57+5:30

अल्पवयीन मुलाने थेट सरकारची फसवणूक करून तब्बल 46 कोटी लुटल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

boy did fraud created fake covid test center receives 46 crores in state payouts | बापरे! अल्पवयीन मुलाचा भयंकर कारनामा; थेट सरकारची फसवणूक करून लुटले तब्बल 46 कोटी

बापरे! अल्पवयीन मुलाचा भयंकर कारनामा; थेट सरकारची फसवणूक करून लुटले तब्बल 46 कोटी

googlenewsNext

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक वेगवेगळ्या घटना समोर आल्या. काही लोक स्वार्थ सोडून दुसऱ्यांना मदत करताना दिसले, तर काही पैसे कमवण्यासाठी या कठीण काळातही लोकांची फसवणूक करताना दिसले. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने थेट सरकारची फसवणूक करून तब्बल 46 कोटी लुटल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

जर्मनीमध्ये एका 17 वर्षीय मुलाला पकडण्यात आले आहे ज्याने बनावट कोरोना टेस्ट सेंटरच्या (Fake COVID Test Center) नावावर राज्य निधीतून 46 कोटी रुपयांचा घोटाळा केला. ही घटना 2020-2021 मध्ये जर्मनीत घडली. यावेळी देशात कोरोना महामारी आपलं भीषण रूप दाखवत होती. अशा परिस्थितीत लोकांना अधिकाधिक कोरोना चाचण्या करून घेण्यास सांगितलं जात होतं आणि त्यासाठी राज्याच्या निधीतून टेस्ट सेंटर्सना पैसेही दिले जात होते. याचाच फायदा घेत एका विद्यार्थ्याने बनावट कोरोना टेस्ट सेंटर उघडून थेट सरकारची फसवणूक केली.

17 वर्षाच्या मुलाला महामारीच्या काळात टेस्ट सेंटर्सना देण्यात येणाऱ्या सरकारी निधीबाबत एक भयंकर कल्पना सुचली. 2020 मध्ये त्याने केवळ कागदावरच बनावट कोरोना टेस्ट सेंटर उघडलं होतं. पब्लिक प्रॉसिक्यूटर ऑफिसच्या म्हणण्यानुसार, जर्मनीच्या डॉक्टर्स असोसिएशनने मुलाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला आणि तो कोरोना टेस्ट सेंटर चालवत असल्याचं गृहीत धरलं. या मुलाने दररोज 5000 चाचणीचं बिल बनवलं आणि केंद्राच्या नावावर पैसे खाल्ले. त्यावेळी कोरोनाची एवढी भीती होती की, टेस्ट सेंटर्स नीट न पाहता बिल स्वीकारून त्यावर अनुदान दिलं जात होतं. याचा फायदा मुलाने घेतला.

असा झाला पर्दाफाश

या घोटाळेबाज मुलाने 5 लाख चाचण्यांचं बिल बनवलं. आश्चर्य म्हणजे डॉक्टर्स असोसिएशनच्या चौकशीतही तो कधीच पकडला गेला नाही. मात्र एका बँक कर्मचाऱ्याला अचानक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यात इतके पैसे पाहून मनी लाँड्रिंगचा संशय आला. त्याने पोलिसांना माहिती दिली असता तपासादरम्यान मुलाची फसवणूक पकडली गेली. मात्र गुन्हा करते वेळी तो अल्पवयीन होता, त्यामुळे त्याला 1 लाख 20 हजारांचा दंड आणि एक वर्षाच्या प्रोबेशनवर सोडून देण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: boy did fraud created fake covid test center receives 46 crores in state payouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.