गर्लफ्रेन्डसोबत टायटॅनिक पोज देत होता तरूण, पाय घसरला अन् दोघेही पडले समुद्रात आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:11 PM2022-05-19T12:11:07+5:302022-05-19T12:12:46+5:30
Titanic Pose Incident In Turkey: लोक समुद्राची सफारी करतात तेव्हा अशी पोज देऊन फोटो काढतातच. असंच काहीसं तुर्कीमधील एका कपलने करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत फारच वाईट घडलं.
Titanic Pose Incident In Turkey: ज्यांनी ज्यांनी 'टायटॅनिक' सिनेमा पाहिला त्यांना त्यातील जहाजावरही जॅक आणि रोजची आयकॉनिक पोज चांगलीच लक्षात असेल. अनेकजण अशी पोज देऊन आजही फोटो काढतात. लोक समुद्राची सफारी करतात तेव्हा अशी पोज देऊन फोटो काढतातच. असंच काहीसं तुर्कीमधील एका कपलने करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत फारच वाईट घडलं.
एका दु:खद घटनेत कोकेलीच्या उत्तर-पश्चिम प्रांतात टायटॅनिक पोज देण्याची प्रयत्न करणाऱ्या कपलचं संतुलन बिघडलं आणि ते समुद्रात जाऊन पडले. या घटनेत पुरूषाचा जीव गेला. तर महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. २३ वर्षीय फुरकान सिफ्त्सी आणि त्याची गर्लफ्रेन्ड माइन दिनार १६ मे रोजी रात्री उशीरा मरीना पोर्टवर मासे पकडत होते. थोड्या वेळाने कपल समुद्र किनारी टायटॅनिकची पोज देण्यासाठी सिक्युरिटी बॅरिअरवर चढले.
तुम्हाला आठवत असेल की, हॉलिवूड सिनेमा टायटॅनिकमध्ये अभिनेता लिओनार्डो दीकॅप्रिओ आणि केट विंसलेट टायटॅनिक जहाजाच्या सेलवर सनसेट दरम्यान एका पोज देत उभे राहतात. माइन दीनारने हॉस्पिटलमध्ये दिलेल्या आपल्या जबाबात सांगितलं की, 'आम्ही ड्रिंक घेतलं होतं आणि मग टायटॅनिक पोज देण्याचा प्रयत्न केला. पण आमचं संतुलन बिघडलं आणि आम्ही समुद्रात पडलो'.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला मासे पकडण्याच्या काठीने खेचून बाहेर काढलं. दीनारला बाहेर काढल्यावर अॅम्बूलन्सने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दीड तासाच्या शोधानंतर सुरक्षा युनिटला फुरकान सिफ्त्सीचा मृतदेह सापडला.