"लिव्ह इन"मध्ये राहत असलेल्या प्रेमी युगूलाची दगडाने ठेचून हत्या

By admin | Published: May 18, 2017 02:41 PM2017-05-18T14:41:57+5:302017-05-18T14:41:57+5:30

लग्न न करता एकत्र राहणा-या प्रेमी युगूलाची सार्वजनिकपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

The boy who lives in "Live Inn" crushes and stole it | "लिव्ह इन"मध्ये राहत असलेल्या प्रेमी युगूलाची दगडाने ठेचून हत्या

"लिव्ह इन"मध्ये राहत असलेल्या प्रेमी युगूलाची दगडाने ठेचून हत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
बामाको, दि. 18 - पश्चिम अफ्रिकेतील माली देशात लग्न न करता एकत्र राहणा-या प्रेमी युगूलाची सार्वजनिकपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्लामिक कट्टरतावाद्यांनी आधी दोन खड्डे खोदले आणि त्यानंतर या प्रेमी युगूलाला एका-एका खड्ड्यात उभं केलं. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी दोघांवर दगडफेक करत त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारची असून तगली शहरातील आहे. 
 
एका स्थानिक अधिका-याने गार्डियन वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमी युगूल लग्न न करताच एकमेकांसोबत राहत असल्याचा आरोप होता. त्यांनी इस्लामिक कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. जिहादी संघटनांना देशाबाहेर काढण्यात आल्यानंतर अशा प्रकारची समोर आलेली ही पहिलीच घटना आहे.
 
जिहादी संघटनांनी मार्च 2012 रोजी मालीच्या उत्तरी भागातील प्रमुख शहरांवर कब्जा केला होता. यानंतर फ्रान्सच्या नेतृत्तात लढताना लष्कराने 2013 रोजी या इस्लामिक कट्टरतावादी संघटनांना देशाबाहेर काढलं होतं. यासोबत जिहादी घटक देशाबाहेर गेले असल्याचं बोललं जात होतं, मात्र असं झालं नाही. आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी वारंवार दहशतवादी हल्ले केले जातात. गेल्या काही वेळेपासून तर सुरक्षा जवानांवरही हल्ले केले जात आहेत. 
 
जिहादी संघटनांचा जेव्हा शहरावर कब्जा होता, तेव्हा त्यांनी तिथे शरिया कायदा लागू केला होता. या कायद्यांतर्गत महिलांनी बुरखा घालणे अनिवार्य करण्यात आलं होतं. नियमांचं उल्लंघन करणा-यांना शिक्षा म्हणून फटके मारले जात, तसंच दगडं मारुन त्यांचा जीव घेतला जात असे. 
 

Web Title: The boy who lives in "Live Inn" crushes and stole it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.