बाफ्टात बॉयहुडने मारली बाजी
By admin | Published: February 9, 2015 11:23 PM2015-02-09T23:23:36+5:302015-02-09T23:23:36+5:30
‘बाफ्टा २०१५’ चित्रपट महोत्सवात रिचर्ड लिंकलेटर यांच्या ‘बॉयहुड’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह तीन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले
लंडन : ‘बाफ्टा २०१५’ चित्रपट महोत्सवात रिचर्ड लिंकलेटर यांच्या ‘बॉयहुड’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह तीन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले; मात्र, ‘द ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल’ने सर्वाधिक पाच पुरस्कार स्वत:च्या नावे केले.
एका मुलाची तरुण होण्यापर्यंतची कथा असलेल्या ‘बॉयहुड’ चित्रपटाचे चित्रीकरण तब्बल १२ वर्ष चालले आणि यादरम्यान त्यातील एकही कलाकार बदलण्यात आला नाही. या चित्रपटासाठी रिचर्ड लिंकलेटर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि पॅट्रिशिया आक्वेंटेला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
‘स्टील एलिस’ चित्रपटात अल्झायमर्स आजाराशी लढणाऱ्या प्रोफेसरच्या भूमिकेसाठी ज्युलियाने मुरेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. एडी रेडमायने सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. (वृत्तसंस्था)