अरे देवा! गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंड संतापला; थेट शाळेलाच लावली आग अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:40 PM2022-08-24T19:40:13+5:302022-08-24T19:40:54+5:30

तरुणाने गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाली म्हणून शाळाच पेटवली आहे.

boyfriend set fire to school after girlfriend fails in exam angry lover | अरे देवा! गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंड संतापला; थेट शाळेलाच लावली आग अन्...

अरे देवा! गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंड संतापला; थेट शाळेलाच लावली आग अन्...

Next

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से देखील सातत्याने समोर येत असतात. असं असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच एका बॉयफ्रेंडने टोकाचं पाऊल उचललं आहे. बॉयफ्रेंड इतका संतापला की त्याने थेट शाळेलाच आग लावल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. 

The National च्या रिपोर्टनुसार, Menoufia प्रांतात ही घटना घडली. एका 21 वर्षांच्या तरुणाने गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाली म्हणून शाळाच पेटवली आहे. या दोघांचं लग्न ठरलं असून त्यांचा साखरपुडा झाला आहे. होणारी पत्नी शाळेतील परीक्षेत नापास झाली तर लग्न पुढे ढकललं जाईल. तिला पुन्हा वर्षभर अभ्यास करावा लागेल, या विचारातून तरुणाने गर्लफ्रेंडची शाळाच पेटवून दिली आहे. आगीमध्ये शाळेतील कंट्रोल रुम जळून खाक झाली आहे. 

शाळेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून गेली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग नियंत्रणात आली. शाळेला आग लावल्यानंतर तरुण पळून गेला आणि स्वत:च्या गावात जाऊन लपला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तरुणाला अटक केली. पोलीस चौकशीत तरुणानं गुन्ह्याची कबुली दिली. त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सध्या तरुण पोलीस कोठडीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: boyfriend set fire to school after girlfriend fails in exam angry lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग