धक्कादायक! १२ वर्षाच्या मुलीने वडिलांची केली हत्या, हत्येचं कारण ऐकून सगळेच गेले चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:51 PM2021-10-25T14:51:48+5:302021-10-25T14:52:54+5:30
Brazil Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही धक्कादायक घटना ब्राझीलच्या सॅंटा कॅटरीनामध्य़े घडली. मृत व्यक्तीचं नाव नीफ लुईस वरलंग आहे. नीफ एक पोलीस अधिकारी होता.
ब्राझीलमधून (Brazil) एक फारच खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे १२ वर्षीय एका मुलीने आपल्या वडिलांची निर्दयीपणे हत्या केली. हैराण करणारी बाब ही आहे की, तिने तिच्या हत्येच्या प्लॅनमध्ये १३ वर्षीय मैत्रिणीलाही सुद्धा सोबत घेतलं होतं. दोन्ही मुली आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या हत्येमागे जे कारण समोर येत आहे ते वाचल्यावर सगळेच हैराण झालेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही धक्कादायक घटना ब्राझीलच्या सॅंटा कॅटरीनामध्य़े घडली. मृत व्यक्तीचं नाव नीफ लुईस वरलंग आहे. नीफ एक पोलीस अधिकारी होता. या हत्येचं कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही म्हणाल की, मुलांना काही गोष्टींपासून दूर ठेवण्यातच भलाई आहे. रिपोर्ट्नुसार नीफच्या मुलीने त्याची हत्या केवळ यासाठी कारणासाठी केली कारण तिला फेमस व्हायचं होतं. मुलगी २००२ साली झालेल्या एका हत्येप्रकरणातून इन्स्पायर झाली होती. यानंतरच तिने आरोपी मुलीसारखी चर्चेत येण्यासाठी इतकं मोठं पाउल उचललं.
डेली स्टारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ब्राझीलमध्ये सुझेन लुईस नावाच्या एका मुलीने २० वर्षाआधी आपल्या आई-वडिलांची हत्या केली होती. त्यावेळी सुजैन शाळेत शिकत होती. हे हत्याकांड तिने तिच्या बॉयफ्रेन्डच्या मदतीने केलं होतं. या धक्कादायक हत्याकांडानंतर सुजैन चर्चेत आली होती. नीफची १२ वर्षीय मुलीने जेव्हा या केसबाबत ऐकलं, तर तिनेही सुजैनसारखं फेमस होण्याचा निश्चय केला.
सुजैन प्रमाणेच या दोन्ही मुलींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पण त्यांना याचा जराही पश्चाताप नाही की, त्यांनी काहीतरी चुकीचं केलं. दोन्ही मुलींना सांगितलं की, त्यांना केवळ फेमस व्हायचं होतं. जे ऐकून सगळेच हैराण झाले. १२ वर्षीय मुलीने १३ वर्षाच्या मैत्रिणीला सोबत घेऊन नीफच्या गळ्यावर तिनदा चाकूने वार केला. दोघींनाही तुरूंगात पाठवण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू आहे.