अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स लपवलेल्या १९ वर्षीय आईला अटक, एका दिवसात कमावत होती ८२ हजार रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:33 PM2021-10-04T16:33:58+5:302021-10-04T16:38:08+5:30
तरूणांमध्ये ड्रग्सची वाढती क्रेझ केवळ भारतातच नाही तर विदेशातही आहे. ब्राझीलमध्ये नुकतीच एका १९ वर्षीय डीलर आईला पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या भारतात बॉलिवूडशी संबंधित ड्रग्स (Bollywood Drugs Case) प्रकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) यालाही ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तरूणांमध्ये ड्रग्सची वाढती क्रेझ केवळ भारतातच नाही तर विदेशातही आहे. ब्राझीलमध्ये नुकतीच एका १९ वर्षीय डीलर आईला पोलिसांनी अटक केली आहे.
ब्राझीलच्या साउ पाओलोमधील भागाला क्रॅकलॅंड म्हटलं जातं. कारण इथे सर्वात जास्त कोकेन आणि इतर ड्रग्सची खरेदी-विक्री केली जाते. पोलिसांनी येथून एक १९ वर्षीय तरूणी लोरोन क्यूटिअर बाओएर रोमिएरोला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने ब्रा आणि अंडरविअरमध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन आणि कॅनबीज लपवून ठेवलं होतं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिला फार फेमस ड्रग डीलर आहे. तिला किटी ऑफ क्रॅकलॅंड म्हणूनही ओळखलं जातं.
लोरेनला काही दिवसांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आलं होतं. कारण तिला तिच्या लहान मुलीला सांभाळायचं होतं. पण नुकतीच तिला पुन्हा अटक करण्यात आली. कारण तिनं तिचं जुनं घर सोडलं आणि नव्या घराचा पत्ता तिने पोलिसांना दिला नाही. पोलिसांनी लोरेनला दुसऱ्यांदा जुलैमध्ये तिच्या बॉयफ्रेन्डच्या घरात पकडण्यात आलं होतं. तिथे मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे ड्रग्स सापडले होते. महिलेच्या वकिलाने दुसऱ्यांदाही मुलीची देखरेख करण्याचं कारण देत जामिनाचा अर्ज केला होता. पण कोर्टाने दुसऱ्यांदा महिलेचा जामीन अर्ज फेटाळला. जज म्हणाले की, महिलेने हाउस अरेस्टच्या नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळे तिला तुरूंगात रहावं लागेल.
पोलिसांनुसार लोरेन एका दिवसात ड्रग्स विकून ८२ हजार रूपयांपेक्षा जास्त कमाई करत होती. रिपोर्ट्सनुसार, लोरेनने साधारण ३ लाख रूपये किलोच्या हिशेबाने ड्रग्स खरेदी केलं होतं आणि ते साधारण ५ लाख रूपये किलोच्या हिशेबाने विकत होती. यामुळे तिचा फायदा वाढत होता. पोलिसांनी सांगितलं की, महिला जेव्हाही ड्रग्स विकण्यासाठी रस्त्यावर निघत होती तेव्हा डार्क रंगाचे कपडे घालत होती. ज्यामुळे तिचे ग्राहक तिला सहजपणे ओळखू शकत होते. महिला मोठी ड्रग डीलर आहे. आता पोलीस चौकशी करत आहेत की, तिचा संबंध कोणत्या मोठ्या ड्रग गॅंगसोबत आहे.