धक्कादायक! उष्णतेपासून बचावासाठी तो फ्रीजरमध्ये जाऊन बसला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:46 PM2021-03-11T12:46:14+5:302021-03-11T12:46:32+5:30
द सनच्या रिपोर्टनुसार, १५ वर्षीय होजे एडुआर्डो रोजाचा मृतदेह पश्चिम-मध्य ब्राझीलच्या कॅंपो ग्रांडे शहरातील त्याच्या आजीच्या घरातील फ्रीजरमध्ये आढळला.
ब्राझीलमध्ये एक १५ वर्षीय मुलाचा फ्रीजरमध्ये गोठून मृत्यू झाला. पोलिसांनुसार, गरमीपासून बचाव करण्यासाठी तो फ्रीजरमध्ये जाऊन बसला होता. पण काही कारणाने बाहेर निघू शकला नाही. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, पीडित परिवाराने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केलाय. त्यांचं म्हणणं आहे की, फ्रीजरजवळ काही खुर्च्याही आहेत. ज्या याचा पुरावा आहेत की, मृत तिथे एकटा नव्हता. काही आणखी लोक तिथे होते जे हे कृत्य करून तेथून फरार झाले.
द सनच्या रिपोर्टनुसार, १५ वर्षीय होजे एडुआर्डो रोजाचा मृतदेह पश्चिम-मध्य ब्राझीलच्या कॅंपो ग्रांडे शहरातील त्याच्या आजीच्या घरातील फ्रीजरमध्ये आढळला. रोजा केवळ शॉर्ट्स घालून होता. पोलीस अधिकारी एलेन बेनिकासाने सांगितले की, ११ जानेवारीच्या घटनेच्या विस्तृत चौकशीनंतर हे स्पष्ट झालं आहे की, रोजाची ना हत्या झाली ना त्याने आत्महत्या केली. ते म्हणाले की, ही केवळ एक दुर्घटना आहे. ज्यात रोजाचा जीव गेला.
पोलिसांनी सांगितले की, मृत आपल्या दादीच्या घराची चावी घेऊन कुणाला काही न सांगता तिथे गेला होता. ज्यानंतर तो गरमीपासून बचाव करण्यासाठी अंगणात ठेवलेल्या फ्रीजरमध्ये जाऊन बसला. पण हे अजून स्पष्ट झालेलं नाही की, त्याचा मृत्यू कशामुळे झाला. मात्र, अधिकाऱ्यांना वाटतं की, एनाबॉलिक स्टेरॉइडच्या वापराने अचानक झालेल्या एखाद्या आजाराने किंवा श्वास गुदमरल्यामुळे रोजाचा मृत्यू झाला असेल. मृतकाच्या परिवारातील लोकांनाही हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे.
रोजाचा मृतदेह सर्वातआधी त्याचा चुलत भाऊ कार्लोस याने पाहिला. तो म्हणाला की, जेव्हा रोजा बराच वेळ दिसला नाही तेव्हा तो त्याला दादीच्या घरी शोधण्यासाठी गेला होता. फ्रीजरमधून दुर्गंधी येत होती. जसं त्याने फ्रीजर उघडलं तो समोर जे दिसलं ते पाहून हैराण झाला. पीडित परिवाराचं मत आहे की फ्रीजरच्या बाजूला काही खुर्च्याही आहेत. तो तिथे एकटा नव्हता.