तरूणीलाच खोदायला लावली तिची कबर, मग गोळी झाडली आणि त्यातच केलं तिला दफन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 02:55 PM2021-12-07T14:55:00+5:302021-12-07T14:56:00+5:30

Brazil : अल्बाच तिच्या मित्राच्या वाढदिवस पार्टीसाठी काही मित्रांसोबत सांता कॅटरिनाला गेली होती. तिथे काही असे लोक होते जे ड्रग्सच्या धंद्याशी संबंधित होते.

Brazil : Girl forced to dig her own grave before being shot dead and buried | तरूणीलाच खोदायला लावली तिची कबर, मग गोळी झाडली आणि त्यातच केलं तिला दफन!

तरूणीलाच खोदायला लावली तिची कबर, मग गोळी झाडली आणि त्यातच केलं तिला दफन!

googlenewsNext

मित्रांसोबत बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या एका तरूणीचा मृतदेह समुद्र किनारी दफन केलेला आढळून आला. या तरूणीवर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली होती. तरूणीला मारण्याआधी हल्लेखोरांनी तिच्याकडूनच तिची कबर खोदून घेतली. मग हत्या करून तिला त्यातच दफन केलं.

'द सन यूके'नुसार, ही घटना ब्राझीलच्या (Brazil) Santa Catarina राज्यातील आहे. मृत तरूणीचं नाव अमांडा अल्बाच आहे. जी केवळ २१ वर्षांची होती. अल्बाचच्या हत्येबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा करत सांगितलं की, 'तिला तिची कबर खोदण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि नंतर तिच्यावर गोळी झाडून तिला दफन केलं'.

पोलिसांनी सांगितलं की, अल्बाच तिच्या मित्राच्या वाढदिवस पार्टीसाठी काही मित्रांसोबत सांता कॅटरिनाला गेली होती. तिथे काही असे लोक होते जे ड्रग्सच्या धंद्याशी संबंधित होते. यादरम्यान अल्बाचने त्यांचे फोटो काढले. हे त्यांना आवडलं नाही. अशात त्यांनी अल्बाचची हत्या करण्याचा प्लॅन केला.

इकडे अमांडा उशीर झाला तरी घरी न आल्याने घरातील लोकांना चिंता वाटली. त्यांनी तिला अनेकदा फोन केला, पण तिचा फोन बंद येत होता. अशात घरातील लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. अशातच पोलिसांच्या हाती एक संशयित ड्रग डीलर लागला. त्याची चौकशी केल्यावर त्याने सांगितलं की, त्यांनी अल्बाचची हत्या केली.

त्याने पोलिसांसमोर खुलासा केला की, त्याने साथीदारांसोबत गोळी मारून अल्बाचची हत्या केली होती. त्याआधी त्याने अल्बाचकडून तिची कबर खोदून घेतली. त्यानंतर तिचा मृतदेह त्यातच दफन केला आणि ते फरार झाले.
 

Web Title: Brazil : Girl forced to dig her own grave before being shot dead and buried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.