Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 02:35 PM2022-09-24T14:35:44+5:302022-09-24T14:36:25+5:30

विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर कोसळलं...; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल...!

brazil Helicopter crashed as its hit with electricity line and fall dowm video viral | Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO

Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO

Next

विमान अथवा हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या बातम्या नेहमीच समोर येत असतात. मात्र, हेलिकॉप्टर अपघाताचा एक व्हिडिओ नुकताच ब्राझीलमधून समोर आला आहे. हे हेलिकॉप्टर अचानकपणे विजेच्या तारांना अडकले आणि क्रॅश झाले या हेलिकॉप्टरमध्ये बडे सेलिब्रिटी उपस्थित असल्याचे समजते.

चुकून विजेच्या तारांना धडकले हेलिकॉप्टर - 
ही घटना ब्राझीलमधील एका शहरात घडली. 'द मिरर'च्या  एका वृत्तानुसार, एका फुटबॉल ग्राउंडवर लँड होण्यापूर्वी हे हेलिकॉप्टर चुकून विजेच्या तारेला धडकले. हेलिकॉप्टरचा विजेच्या तारांना स्पर्श होताच एकदमच वीज तडकल्याचा आवाज आला. यानंतर हेलिकॉप्टर पुढे जाऊ शकले नाही आणि क्रॅश झाले.

खासदार आणि उपमहापौरांसह चार जण होते स्वार - 
हेलिकॉप्टर क्रॅश होताच घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू झाले. सुदैवाची गोष्ट म्हणजे, हे हेलिकॉप्टर विजेच्या तारांचा स्पर्श होताच क्रॅश झाले आणि ते अधिक उंचीवरही नव्हते. या हेलिकॉप्टरमध्ये एका खासदारासह चार जण बसलेले होते आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. खबरदारी म्हणून, या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टरला आग लागली. यामुळे ते पायलटच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात हेलिकॉप्टर खाली कोसळताना दिसत आहे. हेलिकॉप्टर खाली कोसळताच घटनास्थळी एकच धावपळ उडाली होती.

Web Title: brazil Helicopter crashed as its hit with electricity line and fall dowm video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.