ब्राझीलचे आरोग्यमंत्री मँडेट्टा यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:47 AM2020-04-18T05:47:50+5:302020-04-18T07:05:29+5:30

मँडेट्टा हे व्यवसायाने अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी कोविड-१९ महामारीला रोखण्यासाठी जे उपाय केले ते अनेक राज्यांच्या गव्हर्नरांनी राबवलेदेखील.

 Brazilian health minister Mandetta fired | ब्राझीलचे आरोग्यमंत्री मँडेट्टा यांची हकालपट्टी

ब्राझीलचे आरोग्यमंत्री मँडेट्टा यांची हकालपट्टी

Next

रिओ दी जानेईरो (ब्राझील) : ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उपायांवरून मतभेद झाल्यानंतर देशाचे अध्यक्ष जैर बोल्सोनॅरो यांनी आरोग्यमंत्री लुईस हेन्रिक मँडेट्टा यांना पदावरून दूर केले. बोल्सोनॅरो यांनी कोविड-१९ महामारीबद्दल जी भूमिका घेतली त्याबद्दलच अनेक आरोग्यतज्ज्ञांनी संताप व्यक्त केलेला आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील प्रचंड लोकसंख्येचा देश आहे.

मँडेट्टा हे व्यवसायाने अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी कोविड-१९ महामारीला रोखण्यासाठी जे उपाय केले ते अनेक राज्यांच्या गव्हर्नरांनी राबवलेदेखील. त्यांच्या या उपायांची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कोविड-१९ वरील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. अ‍ॅन्थोनी फौसी यांनी सुचवलेल्या उपायांशीही केली गेली. येत्या काही आठवड्यांत ब्राझीलमध्ये कोविड-१९ चा नवा उद्रेक अगदी टोकाला गेलेला असेल, असे भाकीत तज्ज्ञांनी केल्यानंतर मँडेट्टा यांची हकालपट्टी झाली आहे.

Web Title:  Brazilian health minister Mandetta fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.