श्रीलंकेत महागाईचा महापूर; ब्रेडचे पाकीट १५० रुपयांना, दिवाळखोरीची घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:45 AM2022-03-14T06:45:36+5:302022-03-14T06:45:54+5:30

दुधाचे दर सोन्याहून अधिक झाले आहेत. 

Bread worth Rs 150, likely to be declared bankrupt in Sri Lanka | श्रीलंकेत महागाईचा महापूर; ब्रेडचे पाकीट १५० रुपयांना, दिवाळखोरीची घोषणा होण्याची शक्यता

श्रीलंकेत महागाईचा महापूर; ब्रेडचे पाकीट १५० रुपयांना, दिवाळखोरीची घोषणा होण्याची शक्यता

Next

रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. या दोन्ही देशांपासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या श्रीलंकेत तर त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने लंकेत सर्वत्र महागाईचा महापूर आला आहे. त्यात जोडीला अन्नधान्याच्या संकटही उभे ठाकले आहे. कोरोनामुळे भयंकर आर्थिक अडचणींना या देशाला सामोरे जावे लागत आहे. दुधाचे दर सोन्याहून अधिक झाले आहेत. 

ब्रेडचे पाकीट १५० रुपयांना

  • महागाईमुळे गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जवळपास एक हजार बेकरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे ब्रेडच्या एका पॅकेटच्या किंमत १५० रुपयांवर पोहचली आहे.
  • चिकन तर सामान्य लोकांच्या बजेटच्या बाहेर गेले आहे.
  • दिवसभरात ७ तासांपेक्षा अधिक वेळ वीज गायब असल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पर्यटन व्यवसाय ठप्प

  • श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय अगोदरच ठप्प झाला आहे. 
  • जवळपास ५ लाख लोकांचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. तर, २० लाख अप्रत्यक्षपणे पर्यटनाशी जोडले गेलेले आहेत.

दिवाळखोरीची घोषणा होणार?

चीनसह अनेक देशांच्या कर्जात बुडालेला श्रीलंका दिवाळखोर जाहीर होऊ शकतो. - जानेवारीत श्रीलंकेची परकीय चलन गंगाजळी ७० टक्के कमी होऊन २.३६ अब्ज डॉलर झाली आहे. श्रीलंकेला आगामी १२ महिन्यात ५४ हजार कोटींचे देशांतर्गत आणि विदेशी कर्ज चुकते करायचे आहे.

Web Title: Bread worth Rs 150, likely to be declared bankrupt in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.